नागपूर,दि.20ः-कोरोना वायरसच्या प्रभावामुळे देशात लॉकडाऊन असल्याने अशाप्रसंगी गरीब व गरजु लोकांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूरात पुढे आलेला आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनात उमरेड रोड,चामट चौक,ताजाबाद येथे रोज भोजनदान करणे सुरू आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे विदर्भाचे कार्याध्यक्ष शकील पटेल यांच्या कार्यालयातून पदाधिकारी व कार्यकर्तेच्या माध्यमातून २०० च्या वर गरजुंना जेवण उपलब्ध करुन दिले जात आहे.यासाठी अनेकांनी अन्नधान्य,तेल भाजीपाला आणि आर्थिक मदत केलेली आहे.भोजनदान कार्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रवक्ते अतुल लोंढे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधीकारी,प्रा. शरद वानखेडे,प्यारे खान,प्रा.अरुण वर्हाडे,वसीम शेख,नामदेव भुयारकर,राहील शेख,गणेश नाखले,अब्दुल कदीर,विकास गौर,हाजी ऐजाजुद्दीन,राजेश डेंगे,अॅड.ऐजाजुल हलीम,विनीता डेंगे,शहारुख भाई,इरशाद भाई,सलामन भाई,प्यारेभाई शेख,सय्यद रऊफ,बंडु वानखेडे,राहुल अभंग,रोशन कुंभलकर,मयुर वाघ आदी कार्यकर्ता तन मन धनाने सोशल डिस्टंस पराळत कार्यकरीत आहेत.





