30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Featured News हनुमान मंदिर समितीच्या गरजुंना अन्नदान व भोजन

हनुमान मंदिर समितीच्या गरजुंना अन्नदान व भोजन

0
97
गोंदिया,दि.21 : कोरोना विषाणू संसर्ग आजार थांबविण्यासाठी ३ मेपर्यंत   लॉकडाऊन आहे. या काळात रोज कमावून खाणार्‍या व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली असतांना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्या व्यक्तींची गरजपूर्ती होत आहे. अशातच येथील सिविल लाईन स्थित हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने गरजू लाभार्थ्यांना अन्नदान वाटप करण्याची मोहिम हाती घेतली असून गरिबांना भोजनही वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात ज्या व्यक्तींना खर्‍या अर्थाने अन्नाची गरज आहे, त्या व्यक्तींची माहिती घेऊन मंदिर ट्रस्ट तर्पेâ अन्नदान पुरविण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यातच अतिआवश्यक व जिवनाश्यक वस्तू नागरिकांना मिळत आहे. मात्र जे व्यक्ती रोज कमावून रोज खातात अशा व्यक्तींना हा कालावधी कसा निघेल, ही चिंता अद्यापही कायम आहे. मात्र जिल्ह्यात अनेक सामाजिक संघटना तसेच गरजू व्यक्तींकडून या व्यक्तींची सोय होत असली तरी प्रत्येकापर्यंत अद्यापही अन्न पोहचलेला नाही. अशात सिविल लाईन येथील हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रशासनाकडून अशा व्यक्तींची माहिती घेण्यात येत आहे तसेच इतर स्त्रोताच्या माध्यमातून गरजुंची माहिती घेण्यात येत असून त्यापर्यंत अन्नदान पोहचविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर मागिल काही दिवसांपासून भोजनाचे पॉकिट तयार करून ते दररोज वाटप करण्यात येत आहेत. दिवसात किमान २६०० पॅकेट वाटप करण्यात येतात. तर आतापर्यंत १४०० च्या वर गरजवंताना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करण्यात आले आहे.
—–
प्रशासनाच्या निर्देशानुसारच वाटप
हनुमान मंदिर समितीच्या वतीने (दि.२०) पत्र परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी समितीच्या वतीने जी माहिती देण्यात आली, त्यानुसार जिल्हा प्रशासन जी यादी देत आहे व जे निर्देश देत आहे, त्या निर्देशानुसार अन्नदान व भोजन दान कार्यक्रम सुरू आहेत. ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील गरजवंतापर्यंत मदत कशी पोहचेल यासाठी हे कार्य सुरू आहेत. विशेष म्हणजे समितीच्या स्वयंसेवकासह प्रशासनाचे कर्मचारीही भोजन व अन्नदान वाटप वेळी उपस्थित राहतात. खर्‍या अर्थाने गरजवंतांनाच ही मदत पोहचत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. हे कार्य ३ मेपर्यंत किंवा त्या पुढेही समोर राहणार आहे. जो पर्यंत प्रशासन हे कार्य थांबविण्यास सांगणार नाही, तो पर्यंत हे कार्य सुरू राहिल, अशीही माहिती आयोजित पत्र परिषदेत दिली.