गोंदिया, दि. २५ ::– बुद्ध जयंती निमीत्त संविधान मैत्री संघ, सर्व समाज समिती व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने “बुद्धा आले दारी” हा ऑनलाइन उपक्रम शनिवार दि.25 एप्रिल पासुन सुरु करण्यात आला आहे.
7 मे पर्यंत घेण्यात येत असलेल्या या उपक्रमामध्ये संविधान मैत्री संघाच्या फेसबुक ग्रुप वर दुपारी 12 ते सायं 5 वाजे दरम्यान बुद्ध विचारांच्या माध्यमातून घरोघरी जागृती करण्यात येत आहे. बुद्ध जीवन चरित्र माहिती, बुद्ध संदेश, धम्म देषणा, बुद्ध बोध कथा, बुद्ध गीत, बौद्ध चर्चा असे विविध कार्यक्रम धम्म्गुरु, विचारवंत, उपासक- उपासिका, अनुयायी, विद्यार्थ्यांकडुन ऑनलाइन सादर करण्यात येत आहेत. व्हाट्स ऐप्प करिता ” बुद्धा आणि डॉ आंबेडकर यांच्या जीवन प्रसंगावर प्रश्नोत्तरी कार्यक्रम नागपुर चे भदंत डॉ.चंद्रकीत्ती दररोज सायंकाळी 7 वाजता घेत आहेत. तसेच गोंदियातुन भदंत श्रद्धाबोधी मार्गदर्शन करत आहेत.
या कार्यक्रमात कुणीही भाग घेऊ शकते. सहभाग पूर्णत: नि :शुल्क आहे. या ऑनलाइन उपक्रमात शामिल होण्याचे व महाकारुणीक शाक्यमुनी तथागत गौतम बुद्ध यांची जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन संविधान मैत्री संघ, समता सैनिक दल, व सर्वसमाज जयंती समिती ने केले आहे.





