सडक-अर्जुनी,दि.10ः– तालुक्यातील राका येथील रवींद्र फुंडे यांचे चिरंजीव मिथुन व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी रयत येथील तुलाराम भेंडारकर यांची कन्या रंगीताचा विवाह संचारबंदीपूर्वीच 5 मे रोजी आयोजित करण्याचे ठरले होते.त्यातच सध्या लाॅकडाऊनमध्ये संचारबंदी असल्याने आणि लग्नसमारंभाला अधिक लोकांची उपस्थिती बंधनकारक असल्याने वधुवर पित्यांनी संचारबंदीच्या नियमांला ध्यानात ठेवत ठरलेल्या दिवशी 5 मे रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी लग्न लावले.विशेष म्हणजे रोजगारानिमित्त मुंबईला गेलेला वधुचा भाऊ हा संचारबंदीमुळे तिकडेच अडकल्याने त्यांनेही व्हीडीओकाॅलच्या माध्यमातून लग्नसोहळ्यात उपस्थिती लावली.
covid-19 कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे आता विवाह करायचा कसा? असा प्रश्न वर वधू पित्यांना पडला.गोंदिया जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार भामा चुऱ्हे यांनी विवाह स्थगित न करता डेकोरेशन, बँड वाजा, आचारीना दिलेले ॲडव्हान्स व झालेला खर्च याला पर्याय नाही. म्हणून संचारबंदीचे नियम पाळून,प्रशासनाची परवानगी घेऊन नियोजित विवाह ठरलेल्या तारखेला मोजक्या सोयऱ्यांच्या उपस्थितीत उरकवून घ्यावा असा मिथुन आणि रवींद्र फुंडेना सल्ला दिला.रवींद्र फुंडे यांच्या मिथुन या मुलाचा व मुलगी करिष्माचा विवाह भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सोनपुरी येथील जगन कठाणेंचा मुलगा धनपाल याचेशी निश्चित झाला होता. मुलगा व मुलीचे लग्न 5 मेला सायंकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राका येथे संपन्न होणार होते. मुलाचा व मुलीचा लग्न सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे धामधुमीत करण्याचा रवींद्र फुंडे यांचा विचार, परंतु त्यात कोरोना आडवा आला. त्यानंतर 17 मे पर्यंत तिसरा लॉकडावून सुरू झाला. करायचे कसे? याबाबत त्यांनी प्रशासनाला विचारले असता वराकडचे पाच व वधूकडील 20 वऱ्हाड्यायांच्या उपस्थित विवाह संपन्न करण्याची परवानगी देण्यात आली. 5 मे रोजी सकाळी 11.00 वाजता पाच पाहुणे घेऊन वर मिथुन आपले वडील रवींद्र फुंडे सोबत मोटारसायकलवर स्वार होऊन वधू मंडपी परसोडी रयत येथे आले. सामाजिक अंतर व मास्क लावून मिथुन आणि रंगीता यांचा आदर्श विवाह बोटावर मोजण्या इतक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विवाह संपन्न होताच, तास अर्धा तासानंतर मिथुन ने लगेच मोटारसायकलवर नववधू रंगीताला सोबत स्वघरी राका येथे घेऊन गेला. त्याच दिवशी सायंकाळी 4.00 वाजता प्रशासनाने मंजुरी दिलेल्या बोटावर मोजण्याइतक्या मोजक्या पाहुणे मंडळीत करिष्मा व धनपाल यांचा विवाह, संचारबंदी चे नियम पाळून राका येथे संपन्न झाला. लॉकडाऊन मुळे रोजगारासाठी गेलेला भाऊ अजय मुंबईलाच अडकला आहे. अजयने मुंबईवरून व्हाट्सअप व्हिडिओ कॉल वरून बहिणीचा लग्न सोहळा पाहिला.या आदर्श विवाहाचे परिसरात कौतुक केले जात आहे. दोन्ही लग्नसमारंभाला जेवणाची व्यवस्था केलेली नव्हती. सर्व धामधूमीला फाटा देऊन, अगदी साध्या पद्धतीने सामाजिक अंतर पाळत वर, वधू व उपस्थित पाहुणे मंडळींनी मास्क लावून मंगलाष्टका सह शुभ मंगल सावधान म्हणून बोटावर मोजण्याइतक्या जेष्ठ पत्रकार भामा चुऱ्हे,संजीव बडोले,सतीश कोसरकर ,नारायण डोये यांच्या उपस्थितीत उपस्थितांनी वर वधूंना आशीर्वाद दिला.





