जात वैधता प्रमाणपत्र वितरणाचा प्रशासकीय घोळ

0
15

नागपूर-
जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन केलेला अर्ज चुकीच्या नमुन्यात असल्याचे सांगून तो अवैध ठरण्यात आल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तोंडावर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सेवा केंद्राच्या चकार माराव्या लागत आहेत.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केलेला ऑनलाईन अर्ज बाद झाल्याचे १३ नोव्हेंबर २०१४ ला कळविण्यात आले असून जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी १७ नोव्हेंबर २०१४ ही अंतिम तारीख आहे. यामुळे बारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
होत आहे.
महासेतू सेवा केंद्रातून सप्टेंबर २०१३ ला जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांला आज तो अर्जाचा नमुना चुकीचा होता. एप्रिल महिन्यापासून अर्जाचा नवीन अर्ज लागू करण्यात आला असे सांगण्यात येत आहे. ऑनलाईन अर्जाचा नमुना ‘फार्म नं. बी-२, रुल ५(४)’ असा होता. आता विद्यार्थ्यांना फार्म नं. ८, रुल ५ (६) या नमुन्यात अर्ज करण्यास सांगितले जात आहे, असे एका विद्यार्थ्यांने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास तसेच आर्थिक सहन करावा लागत आहे.
ऑन लाईन अर्ज भरतेवेळी साधारणत: अकराशे रुपयांचे खर्च झाला आणि त्याचा कामासाठी आता आणखी खर्च पडत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी, सरकारी नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढणाऱ्या मागासवर्गीयांना जात पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. दरम्यान, राज्याच्या ३५ जिल्ह्य़ांत १५ जात पडताळणी समित्या कार्यरत आहेत. त्यात सरकारतर्फे ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. या १५ समित्यांमध्ये १३८ जागा रिक्त असून सहा समित्यांना पूर्ण वेळ अध्यक्ष नाही.