Berar Times

भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी साकोली तालुक्याच्या पिंपळगावजवळ आयशर ट्रक आणि ट्रॅक्स गाडीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात (Bhandara Accident News) 8 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्व मृतक हे छत्तीसगड राज्यातील मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, छत्तीसगडमधील काही मजूर ट्रॅक्स गाडीने नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. पिंपळगाव येथील एका पेट्रोल पंपावरून एक आयशर ट्रक रस्त्यावर निघत असताना, मागून येणाऱ्या ट्रॅक्स चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव ट्रॅक्स थेट आयशर ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रॅक्स गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या दुर्दैवी अपघातात ट्रॅक्समधील 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नॅशनल हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातातील गंभीर जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तर मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हे सर्व छत्तीसगडचे मजूर आहेत, ते”नागपूर” च्या दिशेने जात असताना हा भीषण अपघात झाला.पेट्रोल पंपावरून निघणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून आलेल्या मजुरांच्या ट्रॅक्सने धडक दिल्याने ही घटना घडली आहे, तर प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची नॅशनल हायवे पोलिसांनी माहिती दिली आहे. उर्वरित गंभीर जखमींना”भंडारा” मेडिकल कॉलेजमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

महामार्गावरील या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

The post भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू appeared first on Berar Times.

महसूल लोक अदालतीचे आयोजन
वाशिम, दि. ११ सप्टेंबर  : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १४ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यात १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, वाशिम यांच्या कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे आपसी सहमतीने अथवा तडजोडीने निकाली काढण्यासाठी महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या महसूल लोक अदालतीचे आयोजन २३ सप्टेंबर २०२६, ९ डिसेंबर २०२६ आणि १६ फेब्रुवारी २०२७ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत करण्यात येणार आहे. महसूल लोक अदालतीचे ठिकाण जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, वाशिम यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, पहिला माळा, खोली क्र. १०४, काटा रोड, वाशिम असे आहे.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाशी संबंधित प्रलंबित प्रकरणांतील अर्जदार, जाबदार तसेच इतर संबंधित पक्षकारांना त्यांची प्रकरणे आपसी सहमतीने अथवा तडजोडीने निकाली काढण्याची इच्छा असल्यास, संबंधित लोक अदालत दिनांकापूर्वी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

कार्यालयाकडून स्वतंत्रपणे नोटीस अथवा सूचना प्राप्त झालेल्या पक्षकारांनी संबंधित लोक अदालत दिनांकास आवश्यक मूळ कागदपत्रे, ओळखपत्र आणि प्रकरणाशी संबंधित अभिलेखांसह नियोजित वेळेत उपस्थित राहावे. दोन्ही पक्षांनी तडजोडीस सहमती दर्शविल्यास शासन निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.

पक्षकार अनुपस्थित राहिल्यास संबंधित प्रकरणाबाबत महसूल लोक अदालत अभियानांतर्गत तडजोडीची कार्यवाही करणे शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी नियोजित दिनांक व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख शिल्पा सानप यांनी केले आहे.

The post महसूल लोक अदालतीचे आयोजन appeared first on Berar Times.

गोंदिया जिल्ह्याला अधिक 461 ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मिळणार
गोंदिया, दि.11 : गोंदिया जिल्ह्याला अधिक 461 ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येत्या काळात मिळणार. निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी कळविलेल्या पत्रकानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या १९ जानेवारी २०१८, २७ मार्च २०२५, २ जून २०२६ आणि ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयांच्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहेत.

जिल्ह्यात दीर्घकाळापासून रिक्त असलेल्या सेवा केंद्रांमुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा मिळविताना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता या केंद्रांचे वाटप झाल्यानंतर ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यासोबतच, नवीन ४६१ सेवा केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले असून, शासनाच्या नियमानुसार पुढील निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

The post गोंदिया जिल्ह्याला अधिक 461 ‘आपले सरकार सेवा केंद्र’ मिळणार appeared first on Berar Times.

पोळ्याच्या दिवशी दाम्पत्याच्या सुखावर काळाचा घात
गोंदिया -पोळ्याच्या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दाम्पत्याच्या सुखावर काळाने घाला घातला. देवरी शहरातील तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाला. ज्योती रुपेश दरों (वय २४) असे मृत महिलेचे नाव असून रुपेश कन्हैयालाल दरो (वय २९) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही दर्रोटोला/भरेगाव, ता. देवरी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेने दर्रीटोला व भरेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोळा सणानिमित्त रुपेश दरों हे पत्नी ज्योती यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच ३५ एवाय १४०९ ने बाहेरगावी जाण्यासाठी निघाले होते. देवरी शहरातील तहसील कार्यालयासमोरील राष्ट्रीय महामार्गावरून ते पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपाच्या दिशेने जात असताना समोरून आलेल्या सीजी ०७ बीए ३०६७क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात ज्योती दरों यांची घटनास्थळीच मृत्यू झाला. तर रुपेश दरों हे गंभीर जखमी झाले. सणाच्या आनंदासाठी निघालेल्या दाम्पत्यापैकी पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

The post पोळ्याच्या दिवशी दाम्पत्याच्या सुखावर काळाचा घात appeared first on Berar Times.

चंदु दुर्गे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ प्रदान
गोंदिया: जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहात आयोजित सोहळ्यात जि. प. हिंदी पूर्व माध्यमिक शाळा, बिरसोला येथील पदवीधर विषय शिक्षक चंदु गोविंदा दुर्गे यांना ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या पत्नी नितु दुर्गे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.जि. प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. शिक्षण सभापती सुरेश हर्षे यांच्यासह जि. प. पदाधिकारी व अधिकारी वर्ग या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दुर्गे यांचे उल्लेखनीय योगदान:

शैक्षणिक व डिजिटल कार्य: रोबोटिक्स, डिजिटल शिक्षण व उपचारात्मक वर्गांच्या माध्यमातून गुणवत्ता वाढवली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे २४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले, तर तन्वी दंदरे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला.

क्रीडा व सांस्कृतिक: विद्यार्थ्यांना ‘अटल क्रीडा महोत्सव’ आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये जिल्हा स्तरावर यश मिळवून दिले.

सामाजिक बांधिलकी: आई-वडील हयात नसलेल्या ३ गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे.

इतर उपक्रम: ‘दप्तरविना शनिवार’, वृक्षारोपण, आपत्ती व्यवस्थापन आणि स्वीप (SVEEP) अंतर्गत मतदार जनजागृती उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला; ज्याची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.त्यांच्या या चौफेर कामगिरीमुळे बिरसोला शाळा व परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

The post चंदु दुर्गे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल ‘जिल्हा शिक्षक पुरस्कार’ प्रदान appeared first on Berar Times.

आरसेटीद्वारे सतर्कता जागरूकता सप्ताह साजरा
गोंदिया, दि.10 : अग्रणी जिल्हा बँक प्रायोजित बँक ऑफ इंडिया स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था गोंदिया येथे सोमवारी बँक ऑफ इंडियाच्या 121 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सतर्कता जागरूकता दिनाचा (Vigillence Awareness Day) कार्यक्रम घेण्यात आला.

सदर कार्यक्रमामध्ये सायबर क्राईम विभागातर्फे श्री. संजय, इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने डॉ. मौसमी तिवारी, डॉ.निखिल नागपुरे, डॉ.गगन टेंभरे, डॉ.शिवानी हरिणखेडे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांचे स्वागत करून संस्थेचे निदेशक अब्दुल वसीम यांच्या प्रस्तावनेतून करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित मान्यवर तसेच संस्थेतील कर्मचारी व प्रशिक्षणार्थीने सत्यनिष्ठतेची शपथ घेतली. त्यानंतर सायबर क्राईम विभागाचे अधिकारी श्री. संजय यांनी आरसेटी गोंदिया येथे सुरु असलेल्या असिस्टंट बुककीपिंग, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन व सर्व्हिसिंग तसेच मशरुम लागवड या प्रशिक्षणामधील प्रशिक्षणार्थ्यांना सतर्कता म्हणजे काय? या विषयावर सखोल मार्गदर्शन करून मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या नागरिकांच्या फसवणूक, फेसबुक इंस्टाग्राम व व्हाट्स ॲपचा कशाप्रकारे सुरक्षितरित्या वापर करून आपले अकाउंट टू फॅक्टर ऑथेंटिकेशनने सुरक्षित ठेवता येते तसेच मोबाईलच्या माध्यमातून युपीआय पेमेंट व एटीएमचा सुरक्षित वापर कसा करावा याविषयी सखोल माहिती दिली.

सोबतच ऑनलाईन माध्यमातून फसवणूक झाल्यास 1930 या क्रमांकावर संपर्क करावे किंवा http://cybercrime.gov.in या वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवावी. इंडियन डेंटल असोसिएशन तर्फे डॉ. मौसमी तिवारी यांनी कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन करून आरसेटी गोंदियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये उद्योजकीय व्यक्तिमत्व व व्यावसायिक कौशल्य विकसित करण्याचे जे कार्य सुरु आहे त्याची प्रशंसा केली. डॉ.निखिल नागपुरे यांनी मौखिक आरोग्य व दातांची काळजी कशी घ्यावी यावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रत्येक व्यक्तीने आपले कौशल्य ओळखून त्यामध्ये वाढ करून जीवनामध्ये यश मिळविता येते अशी माहिती दिली.

The post आरसेटीद्वारे सतर्कता जागरूकता सप्ताह साजरा appeared first on Berar Times.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
राज्यपालांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२७ वा दीक्षान्त समारंभ संपन्न

पुणे, दि. १० सप्टेंबर – :कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे जग वेगाने बदलत आहे. या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र म्हणून पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२७ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद आदी उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, दीक्षान्त समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील विशेष क्षण असून या टप्प्यावर ज्ञानाचे रूपांतर जबाबदारीत आणि शिक्षणाचे नेतृत्वात होते. बदलत्या परिस्थितीत केवळ पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी आजीवन ज्ञानार्जन करत नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. शिक्षण हे केवळ रोजगाराचे साधन नसून समानता, सक्षमीकरण आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे, हा सावित्रीबाई फुले यांचा विचार विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा, असे आवाहनी त्यांनी केले.

श्री.वर्मा म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करून बहुविषयक शिक्षण, कौशल्यविकास, संशोधन, नवोन्मेष, भारतीय ज्ञानपरंपरा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, परवडणारे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या बाबींना प्राधान्य द्यावे. डिजिटल प्रशासन आणि हरित उपक्रमांमुळे विद्यापीठ अधिक पारदर्शक, कार्यक्षम व शाश्वत होण्यास मदत होईल, असेही राज्यपाल वर्मा यांनी सांगितले.

दुबई, सौदी अरेबिया आणि कझाकिस्तानमधील शैक्षणिक भागीदारीमुळे विद्यापीठाचा जागतिक विस्तार अधिक बळकट होऊ शकतो. आंतरराष्ट्रीयीकरणामध्ये विद्यार्थी देवाणघेवाण, संयुक्त संशोधन, आंतरराष्ट्रीय प्राध्यापक आणि जागतिक भागीदारीलाही महत्त्व द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठांनी उद्योग क्षेत्रासोबत भागीदारी वाढवून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, इंटर्नशिप, शिकाऊ उमेदवारी, संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. माजी विद्यार्थ्यांचे जाळेही अधिक सक्षम करून त्यांचा मार्गदर्शन, शिष्यवृत्ती, रोजगार, संशोधन आणि नवोन्मेषासाठी उपयोग करून घ्यावा, असे श्री. वर्मा म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, आरोग्य, कृषी, सायबर सुरक्षा, शाश्वत विकास, ग्रामीण परिवर्तन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रांतील संशोधनाला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक विद्यापीठाने वार्षिक क्रीडा दिनदर्शिका तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका क्रीडा किंवा शारीरिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. क्रीडा विद्यार्थ्यांना शिस्त, संघभावना आणि नेतृत्व शिकवते, असे राज्यपालांनी सांगितले.

विद्यापीठ परिसर सुरक्षित, निरोगी आणि अमली पदार्थांच्या व्यसनापासून मुक्त ठेवण्यासाठी ‘नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत जनजागृती, समुपदेशन आणि सामाजिक उपक्रम राबवावेत. तसेच विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांनी गावे दत्तक घेऊन साक्षरता, डिजिटल शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कौशल्यविकास आणि सामाजिक नवोन्मेषाच्या माध्यमातून स्थानिक समुदायाशी जोडले जावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कामगिरीचा आढावा घेतला. विद्यापीठाशी संलग्न ८५९ महाविद्यालये व परिसंस्थांमध्ये साडेसात लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून, ज्ञाननिर्मिती प्रयोगशाळेपुरती मर्यादित न राहता समाज, गाव, शेत आणि रुग्णालयांपर्यंत पोहोचविण्यावर विद्यापीठाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञाननिर्मिती, संशोधन, लोकाभिमुख तंत्रज्ञान, कौशल्यविकास, डिजिटल परिवर्तन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून विद्यापीठाला नवी उंची देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाला शैक्षणिक परिषद व अधिसभेचे सदस्य, अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, निमंत्रित, पालक आणि पदवीधर विद्यार्थी उपस्थित होते.

The post सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा appeared first on Berar Times.

जिल्ह्यातील शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही– शिक्षणमंत्री दादाजी भुसे
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी; विद्यार्थ्यांशी साधला संवाद

गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा यथोचित गौरव

गडचिरोली, दि. १० सप्टेंबर – : शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानदानाचे पवित्र कार्य निष्ठेने करत आहेत. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन कटिबद्ध असून शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिली.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयींची पाहणी केली. यानंतर सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते.

याप्रसंगी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर जिल्हाधिकारी संजय आसवले, शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रेरक उजगारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी,पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळांना मंदिराप्रमाणे लोकसहभागातून समृद्ध करा

यावेळी मार्गदर्शन करताना शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, गावात ज्याप्रमाणे मंदिर उभारणी आणि विकासासाठी संपूर्ण गाव एकत्र येते, त्याचप्रमाणे शाळा हे ज्ञानमंदिर मानून तिच्या विकासासाठी माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी लोकसहभागातून पुढे आले पाहिजे. शिक्षकांच्या समर्पित प्रयत्नांतून जिल्हा परिषद शाळांचे चित्र सकारात्मकरीत्या बदलत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात शिक्षक प्रतिकूल परिस्थितीतही निष्ठेने ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील महत्त्वाचा घटक असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

जीर्ण व धोकादायक शालेय इमारतींचे तातडीने निर्लेखन करा

शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पुरेशा वर्गखोल्या, क्रीडांगण, ई-लॅब आणि वाचनालय यांसारख्या मूलभूत व शैक्षणिक सुविधा दर्जेदार असाव्यात, असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले. जिल्हा नियोजन समिती, सीएसआर निधी तसेच मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. शाळा परिसरातील जीर्ण, निरुपयोगी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरणाऱ्या जुन्या इमारतींचे तातडीने निर्लेखन करून आवश्यकतेनुसार नवीन इमारतींचे प्रस्ताव व आराखडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती; केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी राज्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया सुरू असून लवकरच रिक्त जागांवर शिक्षक रुजू होतील. त्यामुळे शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत होईल. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासोबत विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक सैनिकी प्रशिक्षणावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाळांना प्रत्यक्ष भेटी; विद्यार्थ्यांशी थेट संवाद

‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी रामनगर येथील पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, आरमोरी रोडवरील प्लॅटिनम ज्युबली हायस्कूल, श्रीमती सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल गोगाव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोगाव तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आयएसओ आदर्श शाळा बोदली येथे प्रत्यक्ष भेटी दिल्या.

या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत शाळेत काय शिकवले जाते, शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात, शाळेत कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, तसेच विद्यार्थ्यांना आणखी कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनीही शिक्षणमंत्र्यांशी मनमोकळा संवाद साधला.

पीएम श्री जवाहरलाल नेहरू नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा, रामनगर : येथे विद्यार्थ्यांचे वाचन आणि कविता गायन ऐकून शिक्षणमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले. वर्गखोल्यांची कमतरता दूर करण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गोगाव : येथे शिक्षणमंत्र्यांनी वृक्षारोपण केले. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला तसेच स्वच्छतागृहांसह शाळेतील मूलभूत सुविधांची पाहणी केली. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आयएसओ आदर्श शाळा, बोदली : येथे विद्यार्थ्यांसोबत पोळा सण साजरा करून शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले. यावेळी डिजिटल वर्ग आणि संगणक लॅबची पाहणी करून नादुरुस्त पॅनेल्स तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आलेल्या वॉल कंपाउंड, शेड तसेच पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनासंदर्भातील मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा गौरव

सामाजिक न्याय भवन सभागृहात आयोजित कार्यक्रमात विविध परीक्षा, विज्ञान, क्रीडा आणि अन्य स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

इस्रो शैक्षणिक सहल : बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (ISRO) शैक्षणिक भेट देणाऱ्या मोहुर्ली मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी सन्ना शकील पठाण हिने इस्रोच्या शैक्षणिक भेटीचा तसेच प्रथमच केलेल्या विमानप्रवासाचा अनुभव आपल्या मनोगतातून मांडला.

‘इन्स्पायर अवॉर्ड’ : आदर्श इंग्लिश हायस्कूल, देसाईगंज येथील ध्रुव विनोद कोवे याचा नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी विशेष सत्कार करण्यात आला.

राज्य विज्ञान मेळावा : राज्य विज्ञान मेळाव्यात द्वितीय पारितोषिक प्राप्त नमन पेदापल्लीवार (इंदिरा गांधी विद्यालय, येनापूर) याचा सन्मान करण्यात आला.

क्रीडा व स्काऊट-गाईड : राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आभा संग्रामे, खो-खो खेळाडू ध्रुव हलामी, राष्ट्रीय कबड्डीपटू श्रवण उसेंडी, कराटेपटू सार्थक गेडाम, वनिता पुंगाटी तसेच सलोनी करपे, वंशिका झंझाळ, कृष्णा नेरकर, रोशन काटवे आणि रमेश बन्सी या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

एनएमएमएस, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा : एनएमएमएस परीक्षेत यश मिळविणाऱ्या वैष्णवी राऊत, स्वीटी उसेंडी, कृतिका गुरुनुले, प्रांजल भोयर यांच्यासह नवोदय व विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन

केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पूर्वा विनोद मडावी आणि श्वेता वासुदेव गेडाम यांचाही सत्कार करण्यात आला.

आदर्श शिक्षक व माजी विद्यार्थी संघ : प्रयोगशील शिक्षक दिलीप नाकाडे, मंगरमेंढा शाळेचे प्रवीण दोर्लीकर

यांच्यासह जिल्ह्यातील उपक्रमशील व तंत्रस्नेही ‘आयडॉल शिक्षकां’चा शाल व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

००००

The post जिल्ह्यातील शालेय पायाभूत सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही– शिक्षणमंत्री दादाजी भुसे appeared first on Berar Times.

गोंदिया ग्रीड पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावी- मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई/गोंदिया, दि.10 : जल जीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या गोंदिया ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोंदिया ग्रीड पाणीपुरवठा योजनेसह गोंदिया मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला.

गोंदिया ग्रीड पाणीपुरवठा योजनेत एकूण ५६ गावांचा समावेश आहे. काही गावांमध्ये जागेची उपलब्धता तसेच तांत्रिक अडचणींमुळे कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. अशा ठिकाणच्या अडचणी तातडीने दूर करून कामे सुरू करावीत, असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.या योजनेअंतर्गत ५२ पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम प्रगतीपथावर असून त्यापैकी ५० टाक्यांची स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित दोन टाक्यांची कामे प्रगतीपथावर असून तीही लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

गोंदिया मतदारसंघातील उर्वरित योजनांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. ज्या गावांमध्ये योजनांची कामे विलंबाने सुरू आहेत, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून अडथळे दूर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीस गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, सहसचिव गीता कुलकर्णी, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे, जल जीवन मिशनच्या अतिरिक्त संचालक दीपाली देशपांडे, अधीक्षक अभियंता अजय सिंग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नागपूर येथील कार्यकारी अभियंता दीपक वाघ, गोंदिया येथील कार्यकारी अभियंता नरेश गणवीर आदी उपस्थित होते.

The post गोंदिया ग्रीड पाणीपुरवठा योजनेची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावी- मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश appeared first on Berar Times.

राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन 12 सप्टेंबरला
गोंदिया, दि.10 : सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.

जिल्हा न्यायालयासह गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार व औद्योगिक न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, ग्राहक तक्रार निवारण मंच तसेच अन्य न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये लोक अदालतीचे आयोजन केले जाणार आहे. लोकअदालतीत तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणांसह मोटार अपघात नुकसानभरपाई, भूसंपादन, महसुली प्रकरणे, वैवाहिक बाद, बँका व वित्तीय संस्थांशी संबंधित वसुलीची प्रकरणे तसेच अन्य प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढता येणार आहेत. वाद मिटविण्यासाठी न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकत्यांचे मंडळ पक्षकारांना मदत करणार आहे.

प्रलंबित तसेच दाखलपूर्व तडजोडीस पात्र प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश आर.जी. वाघमारे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एन.के. वाळके व जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एम.आर. बोरकर यांनी केले आहे.

The post राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन 12 सप्टेंबरला appeared first on Berar Times.