तलाठ्यांवर होणारी कार्यवाही तत्काळ थांबवून मागन्या पूर्ण करा- विदर्भ पटवारी संघाची आ.रहांगडालेकडे मागणी

0
155

तिरोडा,दि.12ः- मागील मे महिन्यात आमगाव तालुक्यातील अवैध रेतीसाठा प्रकरणी तलाठी टी.एच.डोये व मंडळ अधिकारी आर.एल.रहांगडाले यांना दोषी ठरवून निलंबनाची केलेली कार्यवाही मागे घेण्यात यावी.तलाठी सवर्गातून मंडळ अधिकारी पदोन्नती करणे,नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत सन २०१९-२० मध्ये तलाठी यांना लॅपटाप,प्रिंटर खरेदीकरिता निधी मंजूर असतांनाही निधी सरेंडर करण्यात आला. मागील ७ वर्षापासून उपयोगात असलेले लॅपटाप,प्रिंटर सद्यास्थितीत तलाठी वापरत असल्यामुळे कामे प्रगतीने होत नसल्याने नविन संगणक संच देण्यात यावे, तलाठी,मंडळ अधिकारी व कोतवाल यांनी कोव्हीड -१९ च्या कालावधीमध्ये पूर्णवेळ सेवा देत असून विमा सुरक्षा कवच लागू करण्यात यावे,तलाठी,साझा मंडळ पुनररचणेप्रमाणे कार्यवाही करून रिक्त पदे भरण्यात यावी,अंतरजिल्हा बदली झालेल्या तलाठ्यांची मागील सेवा ग्राह्य धरणे,तलाठी कार्यालयाचे भाडे मिळणे,पायाभूत सुविधा पुरविणे,गाव नकाशे पुरविणे,कोतवालाची रिक्त पदे भरून साझावर पाठविणे,मासिक वेतन दर महिन्याच्या ५ तारखेला देणे इत्यादी मागण्या व असहकार आंदोलनाबाबतचे निवेदन तिरोडा- गोरेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांना देण्यात आले. यावेळी गोंदिया जिल्हा तलाठी संघटनेचे अध्यक्ष एम टी मलेवार आणि तिरोडा तालुक्यातील मंडल अधिकारी प्रविन रोकडे, राजेश बोडखे तसेच तालुका सचिव पी ए मुंढे तालुका अध्यक्ष राजू तईकर उपस्थित होते.