पुणे दि.५- राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून, राजकारण न करता गंभीर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे, मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत आज (शनिवार) शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत दुष्काळाबाबत मत व्यक्त केले. शरद पवार यांनी नुकताच दुष्काळी भागांचा दौरा केला असून, यंदाची परिस्थिती भीषण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले, ‘‘राज्य सरकारने दुष्काळाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार तहसिलदारपातळीपर्यंत दिले पाहिजेत. दुष्काळाचा प्रश्न राजकीय करू नका.
गेल्या पन्नास वर्षात अशी भीषण स्थिती मी पाहिली नाही. डिसेंबर महिन्यानंतर परिस्थिती भीषण असल्याची दखल सरकारने घ्यावी. केवळ एका भागासाठी निर्णय नको. राज्याचा प्रमुख म्हणून राज्याचा विचार करायला हवा.