राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी यदुनाथ जोशी

0
12

मुंबई ,दि.१४: महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या पार पडलेल्या निवडणुकीत पत्रकार यदुनाथ श्रीराम जोशी हे अध्यक्षपदी निवडून आले आहेत. श्री. जोशी हे दै. लोकमतचे विशेष प्रतिनिधी व महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत.

सचिवालय जिमखाना येथे निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने पार पडली. समितीच्या सर्व 27 सदस्यांनी या प्रक्रियेसाठी मतदान केले. निवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी आर.एन. गरुड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक (माहिती) शिवाजी मानकर, उपसंचालक (वृत्त) ज्ञानोबा इगवे, वरिष्ठ सहायक संचालक डॉ. संभाजी खराट आदी उपस्थित होते.