सडक अर्जुनी कृउबास सभापती काशिवार तर अग्रवाल यांची उपसभापती पदी निवड

0
20

सडक अर्जुनी,,दि.१४ :कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अविनाश काशिवार यांची सभापती तर आनंद अग्रवाल यांची उसपाभपती पदी निवड करण्यात आली. सभापती पदाच्या निवडणुकीत डॉ. अविनाश काशिवार यांना ११ व भाजपच्या वसंता गहाने यांना ७ मते व उपसभापती पदाच्या निवडणुकीत आनंद अग्रवाल यांना १० व काँग्रेसचे मिताराम देशमुख यांना ८ मते मिळाली. नवनिर्वाचित सभापती व उपसभापतीचे आमदार राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, माजी आ. दिलीप बन्सोड, विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, कुंदन कटारे, सुखराम फुंडे, रुपेश चुèहे, गजानन परशुरामकर, हिरालाल चव्हाण, देवचंद तरोणे, दिलीप गभने, रमेश अग्रवाल, शोभा परशुरामकर, छाया मरसकोल्हे आqदनी अभिनंदन केले आहे.