देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ परिपत्रक काढलं म्हणून ओबीसी आरक्षण धोक्यात आलं- नाना पटोले

0
73

मुंबई | राज्यातील काही जिल्हा परिषदेतील रिक्त जागांचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. देशात ओबीसी आरक्षणाचं राजकारण पेटलेलं असताना या निवडणुका जाहीर झाल्याने जोरदार शाब्दीक युद्ध रंगलं आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण इम्पिरिकल डेटाच्या गोंधळात अडकल्याने राज्यात राजकीय फटकेबाजी चालू आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असणारं इम्पिरीकल डेटा उपलब्ध केला नाही. राज्यातील भाजपने ओबीसींचं आरक्षण संपवण्याचं काम केलं आहे, अशी टीका नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

नाना पटोले यांनी ट्वीट करून फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली आहे. केंद्रातील मोदी सरकाने जनगणनेची आकडेवारी दिली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिपत्रक काढून जि.प. निवडणुका पुढे ढकलण्याचं काम केलं. म्हणून फक्त राज्य नाही तर देशातील ओबासींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे, त्यामुळे भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावं. या शब्दात नाना यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणावर आपली आक्रमक भूमीका कायम ठेवली आहे. ओबीसी आरक्षणासाठी नाना राज्यभर मेळावे घेत आहेत. राज्यातील प्रत्येक ओबीसी नेत्यांला आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन नाना पटोले करत आहेत. नाना पटोले यांच्या टीकेनंतर राज्यातील राजकारणात आता जोरदार जुगलबंदी पहायला मिळणार आहे.

Nana Patole @NANA_PATOLE
केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी परिपत्रक काढून जि.प. निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त राज्य नाही तर देशातील OBC चे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे त्यामुळे भाजप नेत्यांनी @narendramodi यांच्या विरोधात आंदोलन करावे.