तळागाळातील महिला, युवकांच्या लेखन कलागुणानां प्रोत्साहन देण्यासाठी तालुका- ग्रामीण स्तरावर जनजागृती करणार- प्रा.डॉ.दिशा गेडाम

0
31

गोंदिया:- “तळागाळातील महिला, युवकांच्या लेखन व कलागुणानां प्रोत्साहन देण्यासाठी
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण स्तरावर जागोजागी जनजागृती व साहित्यवृद्धी पर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार” असल्याची माहिती आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या जिल्हा अध्यक्षा प्रा. डॉ.दिशा गेडाम यानी दिली आहे. पूढे माहिती देताना त्यानी सांगितले की ” या संस्थे अंतर्गत सुप्रभात चारोळी, कविता , सुभाषित, रांगोळी, दिन विशेष काव्य, कथाकथन, स्त्री संघर्षाची गाथा (ऑडिओ, व्हिडीओ,लिखित) लोककथा, लेख, रचना व यावरील प्रतिक्रिया हे दैनिक उपक्रम राबविण्यात येतील” तसेच सस्थेच्या उद्दीष्टांबाबद माहिती देताना मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच महिलांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त करून देणे, समग्र महिलांना (विश्वभरातील) लिहितं करून एकाच व्यासपीठावर संघटित करणे, “लिहा आणि लिहिते व्हा” हे तत्त्व, मुख्य उद्दिष्ट, जिथे जिथे मराठी भाषा तिथे तिथे मराठी लेखिका संघटित करणे, महिलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे, आतंरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन व ऑफलाईन कार्यक्रम आयोजित करून विश्व व्यासपीठ महिलांना मिळवून देणे ,मराठी साहित्य चळवळ विश्वात्मक करणे, साहित्याबरोबरच विविध क्षेत्रातील महिलांना मुक्त व्यासपीठ प्राप्त करून देणे, तळागळातील महिलांना पुढे आणने, त्यांच्यातील कला गुणांना वाव देणे, मराठी साहित्याकडे व्यापकदृष्टीने पाहण्याची वृत्ती वृद्धीगत करणे, मराठी भाषेत सह मूळ भाषा उदा. गोंडी भाषा, झाडीपट्टी बोली, अहिराणी बोली आदी, पोवारी बोली, गोंडी हलबी लोककथा, लोकगीत, लोक साहित्य संग्रहित व प्रकाशित करणे, तळागाळातील महिलावर्ग व युवावर्ग यांच्या स्वविकासा करिता साहित्यिक मंच उपलब्ध करणे, आदी संस्कृती ची सत्यता जाणून आपल्या साहित्याद्वारे जनजागृती घडविणे, लेखन साहित्याच्या माध्यमाने महिलावर्गाला प्रोत्साहन करणे, सहित्य प्रकाशित करणे, साहित्य संमेलने आयोजित करणे, विविध साहित्य लेखन पुरस्कार प्रदान करणे, विवीध बोलीभाषेतील साहित्य जीवंत ठेवणे, पारंपारिक बोलीभाषा टिकविणे व त्या बोलीत लिहिण्यास प्रोत्साहित करणे अशा प्रकारचे “आम्ही सिद्ध लेखिका” या संस्थेचे उद्दीष्ट आहेत. जिल्ह्यात संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जागृती उपक्रमात महिला युवकानी हीरहिरीने सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रा.डॉ.दिशा गेडाम, उपाध्यक्ष डॉ.सुवर्णा हुबेकर, सचिव प्रा.कविता राजाभोज, कार्याध्यक्ष यशोधरा सोनवणे, कोषाध्यक्ष वंदना कटरे, संचालक-सदस्य प्रा.अनिता कोडापे, पुष्पा लिल्हारे, शालू कृपाले यानी केले आहे. 26 सप्टेंबर ला सालेकसा येथे जागृती कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.