आणखी एक आदर्श ‘साईप्रसाद’ 

0
9

नागपूर -,दि.11-२००० मध्ये कंपनीला दिलेल्या भूखंडाच्या हद्दीत बदल करून पोटविभागणी करत एक जागा साईप्रसाद हाउसिंग संस्थेला देण्यात आली. या सोसायटीची स्थापना काँग्रेसचे नेते राजीव चव्हाण यांनी केली होती. माजी गृह राज्यमंत्री कृपाशंकर सिंह या सोसायटीचे सदस्य आहेत. मुंबई उपनगराचे पालकमंत्री असताना कृपाशंकर सिंह यांनी संस्थेवर कृपा केली होती. बांद्रा रेल्वेस्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला लागून ही जमीन आहे. या सोसायटीत केवळ कृपाशंकर सिंहच नव्हे, तर अनेक आयएएस आणि अन्य वरिष्ठ सनदी अधिकारी हे फ्लॅटधारक आहेत. सध्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, माहिती आयुक्त अजित जैन, माजी पालिका आयुक्त जयराज फाटक, वरिष्ठ पोलिस अधिकारी हिमांशु राय, बिपिन कुमार सिंह, मिलिंद शंभरकर, हेमंत कोटीकर, डॉ. अविनाश ढाकणे, किशोर गजभिये, जिल्हाधिकारी एस. संगीतराव यांचे भाऊ आणि मुलगी यांचे फ्लॅट या इमारतीत असल्याची माहिती अनिल गलगली यांनी दिली.