श्रीहरी अणेंविरोधात शिवसेना आक्रमक

0
13
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर, दि. ११ – स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घेण्याची मागणी करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली असून अणेंच्या या वक्तव्याविरोधात सेना हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे.
श्रीहरी अणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेमध्ये मोठी नाराजी असून आज सकाळी सेना आमदारांनी विधानसभेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले. नेहमी अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार करणा-या शिवसेना नेत्यांनी आज अणेंना बडतर्फ करण्याची मागणी केली. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहीजे असे सेना आमदारांचे म्हणणे आहे.