भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

0
7

मुंबई, दि. १४:- जैन धर्माचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. तसेच महावीर जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, भगवान महावीर यांनी सर्व प्राणिमात्रांच्या अस्तित्वाबाबत ‘जगा आणि जगू द्या ” असा संदेश दिला. सत्य, अहिंसा आणि सत्प्रवृत्ती याबाबत पंचशील तत्वांची शिकवण दिली. त्यांचा मानवकल्याणाचा विचार आजही जगासाठी प्रेरणादायी आहे. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम. भगवान महावीर जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

मुंबई, दि. १४ – भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले असून सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, “जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांनी जगाला सत्य, अहिंसा, परोपकाराच्या मार्गानं चालण्याची शिकवण दिली. मैत्रीची ताकद समजावून सांगितली. जगा आणि जगू द्या, हा संदेश दिला. भगवान महावीर यांच्या विचारात विश्वकल्याणाची ताकद आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.”