कोकण विभागीय विकास प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

0
14

ठाणे,दि.1: शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण विभागीय माहिती कार्यालयातर्फे भरविण्यात आलेल्या विकास प्रदर्शनाच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकाराने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होईलअसा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित विकास प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री श्री. शिंदे बोलत होते. येथील नुतनिकृत टाऊनह़ॉलमध्ये प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी खासदार राजन विचारेआमदार सर्वश्री रविंद्र फाटकनिरंजन डावखरेसंजय केळकरठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्माजिल्हाधिकारी राजेश नार्वेकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडेनिवासी उप जिल्हाधिकारी सुदाम परदेशीमाहिती व जनसंपर्क विभागाच्या कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळेउपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरेजिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधवसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

किल्ल्याच्या तटबंदीप्रमाणे हुबेहुब उभारलेल्या या प्रदर्शनात शासनाचे महत्वपूर्ण उपक्रम व माहिती सुंदर रंगसंगती असलेल्या चित्रफलकांतून मांडण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत शासनाने कोरोना सारख्या कठीण काळात केलेली कामगिरीकृषीआदिवासी विकासशिवभोजनमहाआवास योजनाआरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासह समाजातील सर्वच घटकांचा सर्वांगिण विकास याबाबत सचित्र माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. संपूर्ण प्रदर्शनाची पाहणी करीत पालकमंत्री श्री. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री श्री. शिंदेखासदार श्री. विचारेआमदार श्री. डावखरेश्री.फाटकश्री. केळकरजिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी प्रदर्शनाविषयी आवर्जून अभिप्राय नोंदविले.

यावेळी विभागीय उपसंचालक डॉ. मुळे यांनी पालकमंत्र्यांसह मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांना प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध विभागांच्या पॅनल विषयी त्यांनी माहिती दिली.