
वृत्तसंस्था/मुंबई-महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे तर रुपाली माने मुलींमध्ये पहिली आली आहे. गिरीश परेकर हा मागासवर्गीय प्रवर्गातून राज्यात पहिला आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ४,५ आणि ६ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल हा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये एकूण २00 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
कालच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात देशभरातून अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण झाले. त्यात भर म्हणून आता राज्यसेवा मुख्य परीक्षा २0२0 चा अंतिम निकाल व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने ट्वीट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. याआधी २९ एप्रिल रोजी गुणवत्ता यादी जाहीर जाहीर केली होती. त्यानंतर आता अंतिम निकाल जाहीर केला आहे.
विशेष म्हणजे एमपीएससीने आजच या सर्व पदांसाठी मुलाखती घेतल्या होत्या आणि मुलाखतीनंतर काही वेळातच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससीतर्फे एकूण ६५२ पदांसाठीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये रोहित कट्टे याने राज्यभरातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. अंतिम निकालामध्ये प्रमोद चौगुले हे राज्यभरातून खुल्या प्रवर्गातून प्रथम आले आहेत.