महाराष्ट्रात 37 व मध्यप्रदेशात 45 सारस पक्ष्यांची नोंद,सारस संवर्धनाची गरज

0
28

सारस पक्षी प्रगणना-2022 वनविभाग व सामाजिक संस्थांचा सहभाग

2021 च्या तुलनेत 4 ने सारसाची संख्या कमी

 गोंदिया, दि 16:२०२२ च्या सारस गणनेनुसार, गोंदिया तसेच भंडारा  जिल्ह्यातही सारस गणना झाली. संपूर्ण महाराष्ट्रात सारस पक्षी गोंदिया आणि लगतच्या सीमा भागात आढळतो.सारस गणनेनुसार महाराष्ट्र राज्यात ३७ सारस पक्षी आढळले.मागच्यावर्षीच्या तुलनेत 4 सारसांची संख्या कमी झाली ही चिंतेची बाब ठरली आहे.सारस बचावाकरीता न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही मागील वर्षीच्या तुलनेत सारस पक्ष्यांची कमी झालेली संख्या प्रशासनाच्या नियोजनातील अभाव दर्शवणारी ठरली आहे.

गोंदिया,भंडारासह बालाघाट जिल्हयामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सेवा संस्था, गोंदिया व बालाघाट वनविभाग व विविध अशासकिय संस्थाच्या संयुक्त विद्यमाने सारस पक्षी प्रगणना करण्यात आली.या गणनेत गोंदिया जिल्ह्यात 34,भंडारा जिल्ह्यात 3 व बालाघाट जिल्ह्यात 45 सारस पक्ष्यांची नोंद झाल्याची माहिती सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी दिली.

 गोंदिया जिल्यातील सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा, आमगांव, सालेकसा, देवरी व अर्जुनी मोरगांव या तालुक्यांतर्गत एकुण 64 ठिकाणी सारस पक्ष्यांची प्रगणना करण्यासाठी 42 चमू तयार करण्यात आले होते. सेवासंस्थेसह इतर संस्थेचे एकुण 92 स्वंयसेवक, सारस मित्र तसेच गोंदिया वनविभागातील 50 वनकर्मचा-यांनी सहभाग नोंदविला. या लोकांनी सारस पक्ष्यांचे अधिवास असलेले पाणथळ जागा, नद्या, शेतांमध्ये, तलांवाजवळ जाऊन पाहणी करुन सारस पक्ष्यांची प्रगणना केली. सदरचे सारस पक्षी प्रणना यशस्वीतेसाठी सहभागी विविध अशासकिय संस्थेचे सर्व स्वंयसेवक, सारस मित्र यांना वनविभागाकडुन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

गणनेसाठी गोंदियाचे उपवनसरंक्षक कुलराज सिंह, दक्षिण वनविभाग बालाघाटचे मंडल अधिकारी जी.के. वरकडे,जिल्हा पुरातत्व एवं संस्कृती परिषद बालाघाट, हट्टा  वनपरिक्षेत्र अधिकारी हट्टा गोविंद मरावी,किरनापूर वनपरिक्षेत्र अधिकारी किरनापुर सुयस पांडे,तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री मून,आमगाव वनपरिक्षेत्र अधिकारी आमगांव श्री.मुचलवार,भगत तसेच वनकर्मचाऱ्यांचे व अन्य स्वंयसेवी संस्थाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सेवा संस्थेचे चेतन जसानी,शशांक लाडेकर,कन्हैया उदापुरे,दुस्यंत आकरे,दुश्यंत रेभे,पिंटु वंजारी,रूचीर देशमुख, बंटी शर्मा,गौरव मटाले,सौरभ घरडे, दानवीर मस्करे,कमलेश कांमडे,जैपाल ठाकुर,जलाराम बुधेवार,प्रशांत मेंढे,प्रविण मेंढे,विकास फरकुंडे, डॉ.अनिरुद्ध तांडेकर,बबलू चुटे,मधु डोये,निलू डोये,कैलाश हेमने,राकेश चुटे,जितु देशमुख, प्रशांत लाडेकर,किशोर देशमुख, सोमेश्वर कोल्हे,ध्रुव पटेल,वैभव रुपारेल,डिलेश कुसराम,लोकेश भोयर, पप्पु बिसेन,शेरबहादुर कटरे,बसंत बोपचे, राहुल भावे, रतिराम क्षीरसागर,ललित भांडारकर,रवि पालेवार, निशांत देशमुख, सिंकदर मिश्रा, श्री नखाते, विशाल कटरे,तपेश कटरे,चंदन राहंगडाले, राकेश टेंभुर्णीकर, पराग जीवानी,रजत नागपुरे,सुनील पटले,संतोष हनवते, परमेश्वर पारधी,गोंदिया निसर्ग मंडळाचे संजय आकरे,अशोक पडोळे,मुकुंद धुर्वे, दिपक मुंदडा,भंडारा जिल्ह्यामध्ये वनविभागासोबत SEAT संस्थेचे शाहिद खान यांनी सारस गणना २०२२  मध्ये  सहभाग घेतला.

महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2022

  • गोंदिया जिला – ३४
  • बालाघाट जिला४५
  • भंडारा जिला 0

2021

– बालाघाट : ४७

– गोंदिया : ३९

– भंडारा : ०२

 2020 मध्ये
  • गोंदिया- 45
  • बालाघाट- 56
  • भंडारा- 02
  • चंद्रपूर -01

सारस संरक्षणासाठी शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांसह प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.दरवर्षी पावसाळ्यात सेवा संस्था  आणि वन विभाग सारस पक्ष्याच्या अधिवास असलेल्या ठिकाणी सारस पक्ष्यांची घरटे शोधण्यासाठी  कठीण परिश्रम करतात आणि त्या घरट्यांतून सारस पक्ष्यांचे पिल्लू तयार होऊन उडण्यापर्यंत सारस पक्ष्याची काळजी घेतात. या भागातील, सन २०२१ मध्ये,गोंदिया जिल्ह्यातील ६ सारस आणि बालाघाट जिल्ह्यातील ४ सारसचे पिल्लू  तयार होऊन नव्या जागेच्या शोधात निघाले आहेत.जवळील जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी सारस पक्ष्यांची  उपस्थिती आढळून आली आहे. आणि त्या ठिकाणी पुन्हा तपासणी केली जाईल, ज्यामुळे शेजारच्या जिल्ह्यांमध्ये सारस पक्ष्यांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.