सेजगाव येथे विकास कामांचे भूमिपूजन

0
47

गोंदिया/एकोडी : जवळील सेजगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन १५ जून रोजी पार पडले. यावेळी जि.प.सदस्य पवन पटले, पं.स.सदस्य सौ. ज्योती शरणागत, सरपंच के.के.पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मनरेगा तसेच राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून लोकोपयोगी योजना राबविण्यासाठी ग्रामस्थाचा सहभाग लाभला आहे. या पुढेही गावाला विकासात्मक दृष्टीकोणातून सक्षम बनविण्यासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग मिळेले अशी आशा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
ग्राम पंचायत कार्यालय सेजगावं अंतर्गत विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य पवनभाऊ पटले , पंचायत समिती सदस्या ज्योतिताई शरणागत यांच्या उपस्थितीत योग्यरीत्या पार पाडण्यात आले. सदर कार्यक्रमाला सरपंच के.के.पारधी, उपसरपंच स्वप्नील महाजन , ग्रामसेवक डी.आर. तुरकर, माजी पंचायत समिती उपसभापती डॉ.किशोर पारधी , मिनेश्वरी पारधी, पुस्तकला पटले, मनीषा बावनकर, संगीता बिसेण, मनीषा पारधी, ध्रुवकुमार फुकटकर, विजय गठलक, त्रिलोकानात पारधी आदी ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी भुवन पारधी, राजेंद्र गाठलाकर तसेच गौरी भाऊ पारधी, रविशंकर पारधी, सुकदास शरणागत आदी उपस्थित होते.