नॅचरोपॅथी डॉक्टरांना नोंदणी द्या अन्यथा आंदोलन छेडणार : डॉ अमीर मुलाणी

0
18

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारा इशारा

सोलापूर : नॅचरोपॅथी डॉक्टरांना नोंदणी द्या अन्यथा आंदोलन छेडणार असे वक्तव्य आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी केले आहे नॅचरोपॅथी डॉक्टरांवरती अन्याय होत आहे पॅथीप्रमाणे प्रॅक्टिस करत असताना बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली जात आहे ही कारवाई पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केली जात आहे केंद्र शासन, राज्य शासन, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट व तालुका न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय यांच्या आदेशांचे अवमान करून कारवाई केल्या जात आहे तरी महाराष्ट्रातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना नॅचरोपॅथीचे आदेशाचे तसेच कोर्टाच्या आदेशाचे संपूर्ण ज्ञान देणे खूप गरजेचे आहे कोणत्याही आदेशाचे पाहाणी न करता कारवाई केली जाते. नॅचरोपॅथी बोगस असल्याचे स्पष्टीकरण द्यावे व हे सर्व डॉक्टर ही बोगस आहेत याचा पूर्ण तपशील द्यावा शासकीय अधिकाऱ्यांनी नॅचरोपॅथी बोगस आहे असे लेखी स्वरूपात उत्तर दिले तर महाराष्ट्रातील सर्व नॅचरोपॅथी सेंटर आम्ही बंद करू जर तुम्ही म्हणाल तर नॅचरोपॅथी प्रॅक्टिस करू शकता तर सर्व नॅचरोपॅथी डॉक्टरांना नोंदणी द्यावी दोन्हीपैकी कोणतेही एक उत्तर लेखी स्वरूपामध्ये द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आयुष भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी केला आहे.