हजारों भाजयुमो कार्यकर्त्यांनी घेतला बाइक रैलीत सहभाग

0
29

भाजप प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गोंदिया प्रवासानिमित्त भव्य बाइक रैलीचे आयोजन

गोंदिया: जिल्ह्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर आलेल्या भाजपा प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष ओम कटरे यांच्या नेतृत्वात बाइक रैली काढून भव्य स्वागत करण्यात आले. प्रदेशाध्यक यांच्या प्रथम गोंदिया आगमनावर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहन्यात आला. युवा मोर्चा मार्फत आयोजित या बाइक रैलीत बावनकुळे यांनी स्वतः मोटरसाइकिल चालवित नगर भ्रमण केला. यावेळी पक्षाचे सर्व आजी माजी खासदार, आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सहभाग नोंदविला.
प्रदेश अध्यक्ष झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रवासावर निघालेले चंद्रशेखर बावनकुळे दिनांक 12ऑक्टोम्बर रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या आगमनावर बाइक रैली मार्फत नगर भ्रमण करत स्थानिक जलाराम लॉन येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात भाजयूमो तर्फे पदाधिकारी यांनी अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर विविध बैठका व समाज बांधवांना घर भेट दिली. यानिमित्त बोलतांना त्यांनी कार्यकर्त्याना आपली सरकार आल्यावर शुभेच्छा देत असून जोमाने काम करण्याचे निर्देश दिले. तसेच पुढील नगर परिषद व ग्रामपंचायत निवडणूक बाबद नियोजन करत यश संपादन करावे याबाबद मार्गदर्शन केले.त्यांच्या या रैली मध्ये युवा मोर्चा चे सर्व तहसील अध्यक्ष यांच्या सह युवा मोर्चा कार्यकर्त्यनि परिश्रम केले.