40.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home महाराष्ट्र आ. राणाच्या कार्यालयावर झालेला हल्ला म्हणजे सत्ताधाऱ्यांची दादागिरी – धनंजय मुंडे

आ. राणाच्या कार्यालयावर झालेला हल्ला म्हणजे सत्ताधाऱ्यांची दादागिरी – धनंजय मुंडे

0
31

blank

बीड -एकीकडे आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती देशभर उत्साहात साजरा करीत आहोत. त्याचवेळी दुसरीकडे त्यांचा पुतळा बसवण्यास विरोध करून भाजपाच्या मंत्र्यानी आपली खरी विचारसरणी दाखवून दिली आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यास विरोध करणारे अमरावतीचे पालकमंत्र्यांचा निषेध केला. तसेच या घटनाक्रमातून आमदार रवी राणा यांच्या कार्यालयावरील झालेला हल्ला म्हणजे सत्तेच्या बळावर दादागिरी करण्याचा प्रयत्न असल्याचंही मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं. काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पाठोपाठ रवी राणा यांच्या कार्यालयावरचा हल्ला हा BJP Maharashtraसत्तेचा उन्माद असून हे प्रकार जनता मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा उद्वेगDhananjay Munde यांनी बीड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

blank