मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

0
4

सातारा दि.13-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभुराज देसाई आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी डॉक्टर आणि रुग्णांशी संवाद साधला. आरोग्य शिबिरामध्ये किमान 10 हजार नागरिकांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती.  त्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, आयएमए, कृष्णा रुग्णालय कराड यांची पथके तैनात करण्यात आली होती.

शिबिरात रक्त लघवी तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र रोग, बालरोग, तातडीची सेवा, औषधे, लॅबोरेटरी, एनसीडी, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, औषध विभाग, कान, नाक, घसा, त्वचारोग, किडनी विकार, शस्त्रक्रिया, अस्थिरोग, स्त्रीरोग, मानसोपचार तपासणी असे कक्ष तयार करण्यात आले होते. 40 तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.