तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील पाणीपुरवठा व गटार योजना तातडीने शासनाकडे पाठवा- आ.विजय रहांगडाले

0
15

तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत तिरोडा शहरात रस्ते बांधकाम झाले असून शहरात पावसाळ्यामध्ये नालीच्या पाण्याची समस्या जाणवत असते यावर उपाय म्हणून आमदार विजय रहांगडाले यांनी नगरोत्थान योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजना मंजूर करण्याबाबत शासनाकडे मागणी केली होती. यावर शासनाणे नगर परिषद कडून प्रस्ताव मागतिले,सदर योजनेस तांत्रिक मान्यता तपासणीचे अहवाल विभागीय कार्यालय गोंदिया येथे नगर परिषद तिरोडातर्फे सादर करण्यात आले असून सदर योजना सुरु करण्याकरिता तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत आढावा बैठक मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्रादीकरण विभाग नागपूर यांच्या कार्यालयात आमदार रहांगडाले यांनी आयोजित केली होती. सोबतच नगर पंचायत गोरेगाव येथे वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या विस्तृत प्रकल्प DPR च्या तांत्रिक मंजुरीबाबत चर्चा करण्यात आली. मुख्य अभियंता यांचेकडून मंजुरी प्रदान करण्याचे निर्देश दिले. या बैठकीमध्ये प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, मुख्य अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, मुख्याधिकारी राहुल परिहार उपस्थित होते. या योजनेमुळे तिरोडा नगरवासीयांची गटारातील पाण्याची समस्या तसेच गोरेगाव नगरपंचायत येथील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरुपी दूर होणार असल्याची माहिती आमदार रहांगडाले यांनी दिली आहे.