कुपवाड शहरातील विकास कामांना अधिकचा निधी देऊ – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
2

सांगली, दि. 28  :- कुपवाड शहरातील विकास कामांना अधिकचा निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कुपवाड येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी दिली.

 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतंर्गत कुपवाडमधील सिद्धार्थनगर येथील अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण करणे, मेघजीभाईवाडी येथील अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण करणे आणि पार्श्वनाथ नगर येथील कदम बंगला ते स्मशानभूमीपर्यंत फुल्ल राऊंड गटार करणे या कामांचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कुपवाड व परिसरातील मान्यवर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

कुपवाड शहर व परिसरातील वस्त्यांमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकासाची कामे करण्यात येत आहेत. याबरोबरच या भागातील विकास कामासाठी नगरविकास, आमदार निधी आणि नगरोत्थान मधूनही निधी देऊन या भागातील विकास कामे केली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिली.

०००