• पर्यटन व्यवस्थापण समिती स्थापण
• नोंदणी करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 4 -: पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन 2.0 योजनेमध्ये 55 अधिसूचित पर्यटनस्थळी राज्यातील सिंधुदुर्ग या एकमेव पर्यटनस्थळाचा समावेश झाला आहे. केंद्र शासनाच्या या योजनेमुळे पर्यटनातवाढ होणार असून पायभुत सुविधांचा देखील विकास होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व निवास युनिट्स हॉटेल, ब्रेड आणि ब्रेकफास्ट BNB रिसॉर्ट् स फार्मस्टे, होमस्टे तर इ. टूर ऑपरेटर, पर्यटक गाईड्स, ट्रॅव्हल ऐजन्ट इ. आणि पर्यटन उद्योगातील इतर भागधारकांनी लवकरात लवकर https://nidhi.tourism.gov.in या पोर्टलवर नोंदणी करुन4 ट्रॅव्हल फॉर लाइफ TFL प्रमाणपत्र मिळवावे असेही त्यांनी आवाहन केले.
स्वदेश दर्शन 2.0 उपक्रमाअंतर्गत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पर्यटनस्थळ व्यवस्थापन समिती (DMC) देखील स्थापन करण्यात आली आहे. विविध पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापन उपक्रमांमध्ये समन्वय साधण्यासाठी (DMC) जबाबदार आहे. पहिली डेस्टिनेशन मॅनेजमेंट समितीची (DMC) बैठक जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली डेस्टिनेशन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.