‘नवी पिढी हिंदी, मराठी लिहू – वाचू शकत नाही ही चिंतेची बाब’ – राज्यपाल रमेश बैस

0
5

मुंबई, दि. 19: भाषा व साहित्य विभिन्न संस्कृती व दृष्टिकोन समजण्यास मदत करताततसेच विचारशीलताज्ञान व स्नेहभाव वृद्धिंगत करतात. मात्र आज वाचन संस्कृती लोप पावत आहे. दिवसेंदिवस नवी पिढी मराठीहिंदी व इतर प्रादेशिक भाषा लिहिण्यास व वाचण्यास असमर्थ होत आहे ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलून आपल्या भाषांप्रती नव्या पिढीमध्ये अभिमान जागविण्यासाठी घरोघरी मातृभाषेतच बोलले पाहिजेअसे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.     

साहित्यसंस्कृतीशिक्षणकला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील ४८ व्यक्तींना गुरुवारी (दि. १८) राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते वाग्धारा नवरत्न‘, ‘स्वयंसिद्ध‘, ‘यंग अचिव्हर्स‘ व जीवन गौरव सन्मान मुक्ती सभागृह, अंधेरी, मुंबई येथे प्रदान करण्यात आलेत्यावेळी ते बोलत होते.

इंग्रजी भाषा अवश्य शिकली पाहिजे. त्याही पलीकडे जर्मनफ्रेंचमँडरिन या भाषा देखील शिकाव्या. परंतु मातृभाषेची उपेक्षा करुन विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

आज घरात चार व्यक्ती असतील तर चारही जण मोबाईलवर हरवलेले असतात. त्यामुळे संवाद हरवत चालला. केवळ मुलेच नाही तर आईवडील देखील मोबाईलवर अधिक वेळ घालवतात. व्हाट्सअप हेच जणू विद्यापीठ बनले आहे. चांगली व्यक्ती होण्यासाठी उत्तम वाचनाला पर्याय नाहीयास्तव वाचन संस्कृतीला चालना द्यावी लागेलअसे राज्यपालांनी सांगितले.

ज्येष्ठ साहित्यिक नंदलाल पाठक यांना वाग्धारा जीवन गौरव‘ पुरस्कार प्रदान करण्यात आला.  छत्तीसगड येथील प्रसिद्ध पांडवाणी गायिका रितू वर्मा तसेच तर ज्येष्ठ पत्रकार राजेश बादल यांना वाग्धारा नवरत्न‘ सन्मान देण्यात आला. पत्रकार व संपादक नरेंद्र कोठेकरअभिनेत्री सीमा बिस्वास यांसह इतरांना वाग्धारा‘ स्वयंसिद्ध पुरस्कार देण्यात आला.    

यावेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष जयंत देशमुख,  ‘वाग्धाराचे अध्यक्ष डॉ वागीश सारस्वतकार्यकारी अध्यक्ष दुर्गेश्वरी सिंह महक‘,  ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक विमल मिश्र आदी उपस्थित होते.

सुदर्शन द्विवेदीसंगीता वाघेमंगला वाघेडॉ मुस्तफा युसूफ अली गोमइकबाल ममदानीवीरेंद्र सक्सेनाडॉ राजीव मिश्राडॉ जीवन संखे यांना  देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

000

Maharashtra Governor presents ‘Vagdhara’ awards

in literature, art, journalism, social work

Maharashtra Governor Ramesh Bais presented the ‘Vagdhara Samman 2024’ to 48 eminent personalities from across the country at a function held at Andheri, Mumbai. The Awards were instituted by ‘Vagdhara’ an organisation working in the area of Literature, Culture, Education, Art and Social Work.

Well known writer Nandlal Pathak (Literature) was presented the ‘Vagdhara Jeevan Gaurav Samman’. Well-known Pandwani presented from Chhattisgarh Ritu Verma and senior journalist Rajesh Badal were given the ‘Vagdhara Nav Ratna’ Samman. Journalist and Editor Narendra Kothekar and actor Seema Biswas were presented the ‘Vagdhara Swayamsiddh’ Samman by the Governor.

Head of the Selection Jury Jayant Deshmukh, President of ‘Vagdhara’ Dr. Vageesh Saraswat, Executive President Durgeshwari Singh ‘Mehak’, senior journalist Vimal Mishra were present.