देवरी येथे सेक्युरिटी गॉर्ड भरती आजपासून सुरू

0
7

देवरी,दि.१८- देवरीच्या आदिवासी शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीन स्थानिक क्रीडा संकुल परिसरात सेक्युरिटी गॉर्डसाठी मेगा भरती आज गुरूवारी( दि.१८) सुरू करण्यात आली.

सदर भरती ही १८ ते २२ जानेवारी पर्यंत करण्यात येणार असून आज पहिल्याच दिवसी ७५ उमेदवारींनी क्रीडा संकुल परिसरात गर्दी केली होती. या उमेदवारांपैकी २९ उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आल्याची माहीती संस्थेचे सदस्या लोकनाथ तितराम यांनी दिली. यावेळी माजी जिप सदस्य राजेश चांदेवार, सामाजिक कार्यकर्ते संजय मारवाडे, शिव स्वराज्य सेक्युरिटी कंपनीचे भरती अधिकारी गोरख जगताप हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.