उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबईत आगमन

0
9

मुंबई दि. २८ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ येथे आज सपत्नीक आगमन झाले.

राज्यपाल रमेश बैस, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद, राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, तसेच  इतर विभागाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.