उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या,स्मिता बेलपत्रे यांची भंडारा येथे बदली

0
67
 गोंदिया,दि.02- लोकसभेच्या लवकरच होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे शासन आदेश आज निर्गमित करण्यात आले.यामध्ये गोंदियाच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली.तर त्यांच्या जागेवर नागपूर सुधार प्रन्यासच्या विजया बनकर यांची निवासी उपजिल्हाधिकारी गोंदिया म्हणूून बदली करण्यात आली आहे. असून राज्याच्या सर्वच महसूल विभागातील कालावधी पूर्ण झालेले वा स्थानिक रहिवाशी असलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे.