अब्दुल सय्यद यांची डि.बी.ए.च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

0
3

सोलापूर : राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी भारत (रजि.) या संस्थेच्या सोलापूर जिल्हाच्या जिल्हाध्यक्षपदी अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद निवड करण्यात आली असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अब्दुल सय्यद हे प्रतिभावंत कवी असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारात वाहक (कंडक्टर) या पदावर कार्यरत असून आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून आज उत्तम प्रकारे साहित्य सेवा करीत आहेत. आपल्या फावल्या वेळत आपली कामगिरी बजावत ते उत्तम प्रकारे विविध विषयांवर काव्य लेखन करीत असतात. आतापर्यंत त्यांनी ५०० कविता, ५००० चारोळ्या, १०० अभंग, १५ पाळणे ५० गझल यांहून अधिक लेखन केले असून त्यांचे साहित्यिक क्षेत्रातील काम अतिशय कौतुकास्पद असल्याने त्यांची सोलापूर जिल्हाच्या अध्यक्षपदी
निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव, भावना खोब्रागडे संस्थापिका व संपादिका, अशोक पवार पुणे विभागीय अध्यक्ष यांनी दिली आहे. या निवडीबद्दल एसटी साहित्य रसिक समूहाचे संस्थापक राकेश शिवदे यांच्यासह समूहाच्या सदस्यांनी तसेच एसटी परिवारातील अनेकांनी अभिनंदन केले आहे.