प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणेबाबत निर्बंध जारी – जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे

0
3

सिंधुदुर्गनगरी दि.18 – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी कार्यक्रम दि. 16 मार्च 2024 रोजी घोषित केला आहे. या अनुषंगाने निवडणूकीचे प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, आदीसाठी जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी किशोर तावडे यांनी निर्बंध आदेश जारी केला आहे.
यामध्ये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टप्पा पासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्य फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहनचालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवार लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवणूक प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यातिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. सदचा आदेश निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत दि. 6 जून 2024 पर्यंत अमलात राहतील.