जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथे तालुकास्तरीय निपुणोत्सव उपक्रम थाटात

0
18

अर्जुनी मोर.-जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मोरगाव येथे तालुकास्तरीय निपुणोत्सव उपक्रमाचे आयोजनपंचायत समिती अर्जुनी-मोर चे गटशिक्षणाधिकारी ऋषीदेव मांढरे यांचे अध्यक्षतेखाली व पंचायत समिती अर्जुनी मोरगाव चे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अनिल चव्हाण, बेनिराम भानारकर, गटसमन्वयक सत्यवान शहारे ,मुख्याध्यापिका रेखा गोंडाने, केंद्रप्रमुख सु.मो. भैसारे, विषय साधन व्यक्ती चंद्रशेखर ढोके, विजय मेश्राम,त्रिवेणी रामटेके, पडोळे मॅडम यांचे प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाले.
सदर मेळाव्यात भाषा आधारित परिपाठ,मराठी भाषा दिन वाचन कोपरा,वाचन उत्सव वाचन उपक्रम ,निपुण वर्ग सजावट स्पर्धा व भाषा समृद्धी संचातील साहित्यांचा वापर , निपुण अभियान अंतर्गत शिक्षक निर्मित साहित्य प्रदर्शन शाळा निपुण होण्यासाठी केल्या गेलेल्या उत्तम कृती, त्यासाठी येणाऱ्या अडचणी आवश्यक मदत यावर वरिष्ठ विस्तार अधिकारी अनिल चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. सदर निपुणोत्सव उपक्रमात 15 केंद्रातील , केंद्र स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त शिक्षकांनी सहभाग झाले होते तसेच व्यवस्थापन समिती सदस्य यांना सहभाग करून घेण्यासाठी पाचारण करण्यात आलेले होते .
तालुका अर्जुनी मोरगाव निपूणोत्सव उपक्रमात केंद्रातील सर्व शिक्षकांनी उस्फूर्त सहभाग दर्शवून, विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती करून, त्या शैक्षणिक साहित्यांचा अध्ययन-अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांचे वाचन ,लेखन ,संख्याज्ञान यावर उत्कृष्ट आधारित सादरीकरण केले.सदर जिल्हा स्तरीय निपुणोत्सव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी , कु.गुंफेश बिसेन स.शि.केशोरी, सुनंदा येल्ले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुंगली शारदा किसन कापगते, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी/ रयत निबंध स्पर्धेमध्ये एम व्ही येरने, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ,चापटी तर उपक्रमशील शिक्षक म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अर्जुनी मोर क्रमांक १चे सहाय्यक शिक्षक नरेंद्र बनकर उपक्रमशील केंद्रप्रमुख म्हणून सु. मो.भैसारे यांना जिल्हा स्तर पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.
प्रस्तुत निपुणोत्सव उपक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण गटसमनव्यक सत्यवान शहारे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे व आभार प्रदर्शन केंद्रप्रमुख सु.मो.भैसारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वामन घरतकर, व्ही.बी. भैसारे, जितेंद्र ठवकर, पुरुषोत्तम गहाणे, अचला कापगते, रेवानंद उईके आदींनी सहकार्य केले .शेवटी वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.