रायगड,दि.14:- सार्वत्
“वॉक फॉर वोट रॅली”चा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. “वॉक फॉर वोट”रॅलीसाठी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी निर्मला कुचिक, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे,अलिबाग तहसिलदार विक्रम पाटील, अलिबाग नगरपरिषद मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली पाटील यांनी लोकशाहीचा उत्सव पोवाडा सादर केला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून आज सकाळी आठ वाजता सुरु झालेली रॅली त्यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय येथून. ब्राह्मण आळी, महावीर चौक बालाजी मंदिर नाका, बीच रोड, एसबीआय बँक या मार्गाने शहरातील विविध भागातून नेऊन जिल्हाधिकारी येथे समारोप करण्यात आला.
यावेळी रॅलीमध्ये मतदानाबाबत प्रचारगीते, चित्ररथ, फलक याद्वारे घोषणा देत व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आली. आजच्या रॅलीसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा सेविका यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी सहभागी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता परिसरात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटवर भेट देऊन मोठ्या प्रमाणात सेल्फी घेत होत्या. यातून जिल्ह्यातील 7 मे रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेत सहभागी होत मतदान करण्याचा संकल्पच दिसून येत होता.