गोंदिया,दि.०२- सामान्य प्रशासन विभागाने भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांची बदली केली असून त्या ऐवजी पुणे येथील संजय कोलते य़ांची भंडा-याचे नवे जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करीत तातडीने रुजू होण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे सामान्य प्रशासन विभागाने हापकिनचे व्ययवस्थापक अनिल पाटील यांनाही पत्राद्वारे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने आपली नियुक्ती जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग या पदावर किशोर तावडे, भाप्रसे यांच्या जागी ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे आणि आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून असलेल्या व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त, नियोजन विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार तावडे, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, असे अनिल पाटील यांना पाठवण्यात आलेल्या बदलीच्या पत्रात म्हटले आहे.
भंडाऱ्याचे संजय कोलते तर सिंधुदुर्गचे अनिल पाटील नवे जिल्हाधिकारी
वाढदिवसाच्या शुभेच्छा