अभिषेक कृष्णांनी सांभाळला नाशिक महापालिकेचा कार्यभार

0
9

नाशिक,दि.09 – महापालिका अायुक्त पदाची सुत्रे अभिषेक कृष्णा यांनी शुक्रवारी स्वीकारली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बहुचर्चित कपाटांचा विषयावर सर्वच समस्यांची उत्तरे असतात, असे सांगून या विषयावर अभ्यासाअंती उपाय शाेधला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेचे अतिरिक्त अायुक्त म्हणून काम करताना अशा प्रकरणांत प्रीमियम अाकारून उत्पन्नात वाढ करण्यात अाल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापालिकेचे मावळते अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी शुक्रवारी अापल्या निवासस्थानीच अभिषेक कृष्णा यांना अायुक्तपदाचा कार्यभार दिला. मुंबईच्या विक्रीकर विभागात सहअायुक्त म्हणून डाॅ. गेडाम यांची बदली झाली असून, त्यांच्या जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांना कार्यभार देण्यात अाला अाहे. कृष्णा हे साेमवारी नाशिक पालिकेत रुजू हाेणार हाेते. परंतु, त्यांनी शुक्रवारीच पालिकेत प्रवेश करीत सर्वांना अाश्चर्याचा धक्का दिला. पत्रकार परिषद घेऊन अापली भूमिका विशद केली. बांधकाम क्षेत्रातील कपाटाच्या मुद्याची अापल्याला कल्पना असून, त्याचा सविस्तर अभ्यास मी करणार अाहे. फक्त त्यासाठी काही वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक समस्येवर उत्तर असते, ते शाेधावे लागते असे सांगत कृष्णा म्हणाले .