राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरेंचा दारूण पराभव

0
206

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे ते विजयाचा गुलाल उधणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. मात्र निकाल समोर येताच राज ठाकरे यांचे पुत्र यांना मोठा धक्का बसला आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत (Mahesh Sawant) यांचा विजय झाला आहे. यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.अमित ठाकरेंना मनसेकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून माहीम विधानसभा मतदारसंघाची महाराष्ट्रभर चर्चा सुरु होती. अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने महायुतीकडून पाठिंबा दिला जाईल, अशी शक्यता होती. परंतु सदा सरवणकरांनी माघार घेण्यास नकार दिला.उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत हे पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी आधीपासून लीड कायम ठेवली. तर त्यानंतर शिवसेनेचे सदा सरवणकर हे दुसऱ्या क्रमांकावर आणि त्या खालोखाल अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर होते.