‘बाप बाप होता है’; विजयानंतर धर्मरावबाबा आत्रामांनी लेकीला सुनावलं

0
185

गडचिरोली- जिल्ह्यातील अहेरी मतदार संघात कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार धर्मराव आत्राम यांचा एकतर्फी विजय झाला. त्यानंतर मोठा जल्लोष आत्राम व त्यांच्या समर्थकांनी केला. निकाल जाहीर झाल्यानंतर धर्मराव आत्राम हे जल्लोषात डान्स करत होते.

धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम रिंगणात होती. या लढतीत धर्मरावबाबा आत्राम यांचा विजय झाला. त्यानंतर बाप बाप होता है, अशी प्रतिक्रिया धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली आहे.

दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकाच कुटुंबातील असणाऱ्या या लढतीत प्रचार दरम्यान अनेक नाट्य झाली होती. धर्मराबाबा यांनी मुलीवर अनेक आरोपही केले होते.निवडणुकीआधी भाग्यश्री आत्राम यांनी ‘घड्याळ’ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन ‘तुतारी’ फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. बापलेक आमनेसामने आले होते. विधानसभा निवडणुकीत लेक थेट बापाविरूद्ध उभी ठाकली होती.