35.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home महाराष्ट्र आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश, श्वेता सिंघल अमरावतीच्या नव्या विभागीय आयुक्त

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश, श्वेता सिंघल अमरावतीच्या नव्या विभागीय आयुक्त

0
15124

blank

राज्य शासनाने राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून अमरावती विभागाच्या महसूल आयुक्त श्रीमती निधी पांडे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी राज्याचे राज्यपाल यांच्या सचिव राहिलेल्या श्वेता सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 १). प्रवीण दराडे (IAS:RR:1998) यांची प्रधान सचिव, (सहकार आणि पणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 २). पंकज कुमार (IAS:RR:2002) यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 ३).नितीन पाटील(IAS:SCS:2007) सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 
४). श्रीमती श्वेता सिंघल (IAS:RR:2009) राज्यपालांच्या सचिव, महाराष्ट्र यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
५). डॉ. प्रशांत नरनावरे, (IAS:RR:2009) सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
६). अनिल भंडारी (IAS:RR:2010) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
७).पी.के.डांगे (IAS:SCS:2011) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 
८). एस. राममूर्ती (IAS:RR:2013) सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
९). अभिजित राऊत (IAS:RR:2013) जिल्हाधिकारी, नांदेड यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१०). मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) सह आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 ११).  राहुल कर्डिले (IAS:RR:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
 १२). श्रीमती.माधवी सरदेशमुख (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
 
१३). अमित रंजन (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

blank