गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
49

अर्जुनी-मोर. गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंजि यशवंत गणविर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल्ल पटेल, माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हि विकास कामे गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रात मंजूर केली.आणि गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासात भर घातली.मौजा परसोडी रै ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा झोडेटोली येथे हनुमान मंदिर जवळ चावळी बांधकाम ७ लक्ष, सिमेंट नाली बांधकाम ५ लक्ष,चान्ना कोडका येथे सिमेंट नाली बांधकाम ७ लक्ष, सिमेंट रस्ता बांधकाम ७ लक्ष, सिमेंट नाली बांधकाम ५ लक्ष,पांढरवाणी रै येथे चावळी बांधकाम ७ लक्ष,परसोडी रै येथे पुल बांधकाम ५ लक्ष, सिमेंट रस्ता बांधकाम ८ लक्ष, मौजा कान्होली येथे स्मशानभूमीत सिमेंट रस्ता बांधकाम ७ लक्ष, मौजा गवर्रा येथे सिमेंट रस्ता बांधकाम ५ लक्ष अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
सदर भुमिपुजन सोहळ्याला सरपंच दयाराम लंजे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रभान टेंभुर्णे, प्रकार कोरे,वनिता नागपुरे, सरपंच छाया अमले, उपसरपंच जागेश्वर मते, सरपंच नरेंद्र लोथे, गजानन कोवे, इंजि जगदीश पंधरे, इंजि विजय भैसारे, इंजि पराग कापगते तथा गावकरी उपस्थित होते.