सोलापूर : बुधवार पेठ येथील मध्यवर्ती मिलिंद नगर येथे साकारण्यात येणाऱ्या नूतन बुद्धविहाराच्या बांधकामाचा पायाभरणी समारंभ नुकताच भीमशक्ती सेना तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात संपन्न झाला. परिसरातील बौद्ध बांधवांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असून, या ठिकाणी भव्य तीन मजली बुद्धविहाराची उभारणी केली जाणार आहे.
या सोहळ्याचे पूजन भीमशक्ती सेना तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मंडळाच्या शुभहस्ते करण्यात आले. मिलिंद नगरमधील सामाजिक ऐक्य आणि धम्म कार्याला गती देण्याच्या उद्देशाने या भव्य प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.
या मंगलप्रसंगी भीमशक्ती सेना तरुण मंडळाचे आधारस्तंभ विशाल मामा माने, काशीम साळवे, ज्येष्ठ सल्लागार मुन्ना आखाडे आणि मंडळाचे मार्गदर्शक आतिश (पॅंथर) बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी यावेळी बुद्धविहाराच्या बांधकामाबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मंडळाचे अध्यक्ष गौरव कांबळे आणि सचिव विशाल कांबळे यांनी केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मंडळाची खंबीरसाथ आनंद (अण्णा) भालेराव, चांद निकंबे आणि मानव सोनवणे,तसेच परिसरातील ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश सरवदे, अमर साळवे, संजय बनसोडे, आणि धम्म कार्यासाठी सदैव तत्पर असणारे धम्मसेवक गौतम गायकवाड, करण माने, श्रवण कांबळे, सचिन जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आणि तरुण कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते.





