कोपरगाव नगरपरिषदेच्या शहरविकासाला नवी दिशा देण्यासाठी विविध विषय समित्यांचे नुकतेच गठन करण्यात आले असून, या समित्यांमध्ये महिलांचे सशक्त नेतृत्व ठळकपणे पुढे आले आहे. एकूण सहा पैकी चार समित्यांवर महिलांची निवड होऊन कोपरगाव नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे ‘महिला राज’ प्रस्थापित झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निलोफर फिरोज पठाण, पाणीपुरवठा समितीवर वैशाली विजय वाजे, शिक्षण, क्रीडा व संस्कृती समितीवर संजना संजय उदावंत तर महिला व बालकल्याण समितीवर सविता कैलास मंजूळ यांची निवड करण्यात आली आहे.या समितीवर उपसभापतीपदी मनीषा दत्तू पगारे यांची निवड झाली आहे.नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशूर तर स्वच्छता व आरोग्य समितीवर वैभव सुधाकर आढाव यांची निवड करण्यात आली आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समितीवर विद्या राजेंद्र सोनवणे आणि प्रसाद बाळासाहेब आढाव यांची सर्वानुमते,एकमताने निवड करण्यात आली.या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आ.स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व मान्यवर, नगरसेवक व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.





