पुणे/वृत्तसेवा-महापुरूषांच्या नावाने वाद निर्माण करून जातींना आपसात लढवले जात आहे, नाव न घेता असा हल्लाबोल क्षत्रिय मूलनिवासी महासंघाचे राजस्थान प्रदेश विधी सल्लागार अॅड. जितेंद्र सिंह शेखावत यांनी बुधवारी ब्राह्मणी व्यवस्थेवर केला. ते भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा गर्व मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना आणि लहुजी क्रांती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून शिरूर येथे आयोजित बहुजन महापुरुषांच्या सामूहिक जयंतीनिमित्त प्रबोधन संमेलनात बोलत होते.
अॅड. जितेंद्र सिंह शेखावत पुढे म्हणाले कि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. जी वास्तविक जयंती आहे. या जयंतीवरून जो कार्यक्रम ठेवण्यात आला आहे, यासाठी मी भारत मुक्ती मोर्चा आणि वामन मेश्राम साहेब यांना धन्यवाद देतो. ते यासाठी कि त्यांनी वास्तविकतेला बाहर आणण्याचे काम केले आहे. सार्वजनिक मंचावरून त्यांनी हे उघड केले आहे कि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला.
महापुरूषांच्या जाती आणि जयंतीवरून जे विवाद पसरवले जातात, जी कंट्रोवर्सी निर्माण केली जाते, ही कंट्रोवर्सी सहजपणे निर्माण केली जात नाही तर जाणीवपूर्वक निर्माण केली जाते. जेणकरून निर्माण करणार्यांना याचा फायदा मिळेल. अशा बाबींपासून ते सर्व फायदा घेतात. आणि आम्हाला हे कळतचं नाही कि ते याचा फायदा कशाप्रकारे घेताहेत, असेही त्यांनी लक्षात आणून दिले.
राजस्थान प्रदेश क्षत्रिय मूलनिवासी महासंघाचे विधी सल्लागार म्हणाले कि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो जन्मदिवस आहे, तो आज म्हणजे 8 एप्रिल रोजी साजरा केला जात आहे. परंतू नागपुरात आरएसएस नावाची जी यूनिवर्सिटी सुरू आहे, या यूनिवर्सिकडून जे बहुजन महापुरूष आहेत, त्यांना वेगवेगळ्या जातीत विभागले जात आहे. एखाद्या महापुरूषाला जातीच्या वादात, कुणा महापुरूषाला जन्मदिवसाच्या वादात अडवले जात आहे. असे यासाठी केले जात आहे कि जर कोणत्याही महापुरूषाला वादात अडकवायचे आहे किंवा या महापुरूषांप्रती लोकांच्या ज्या भावना आहेत, यातून महापुरूषांना त्यांना मुक्त करायचे आहे तर महापुरूषांच्या चरित्राचे हनन केले पाहिजे.
महापुरूषांचे चरित्र हनन करण्याचे काम आज नाही तर सातत्याने केले जात आहे. भारतातील जेवढेही महापुरूष आहेत, त्यांना कोणत्या न कोणत्या वादात अवश्य अडकण्यात आले आहे. मग ते धर्माच्या नावाने असो कि जातीच्या नावाने, जन्मदिवसाच्या नावाने, भाषेच्या नावाने किंवा क्षेत्राच्या नावाने असो. यामुळेच ते कायम सत्तेत असतात, अशी टीका अॅड. जितेंद्र सिंह शेखावत यांनी केली.
शेखावत म्हणाले कि ते सार्वजनिकपणे असे वाद निर्माण करत नाहीत. असे काम गुप्तपणे सुरू असते. मग जे लोक तर्क करत नाहीत, असे लोक त्यांची गोष्ट मान्य करतात. जे लोक पाखंडवादी आहेत किंवा पाखंड पसरवण्याचे काम करतात, जे 24 तास या प्रकारचे राजकारण किंवा षडयंत्र करतात कि कोणत्या न कोणत्या महापुरूषाचे नाव घेऊन लोकांना वादात अडवतात. जर असे केले तर त्यांचे कर्मकांड लपून राहते.
एक सिद्धांत आहे, जर तुम्हाला काही काम करायचे आहे, जर एखादा मोठा गुन्हा आहे आणि खोटं लपवायचं आहे तर दुसरं एखादं अस काम करा कि लोकं लक्ष त्यापासून विचलित होईल. म्हणून आम्हला समजून घ्यायचे आहे कि आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सार्वजनिक मंचावरून साजरी करत आहोत. हे छोटं मोठं काम नाही. ही आमच्यासाठी गर्वाची बाब आहे. अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
अॅड. जितेंद्र सिंह शेखावत म्हणाले कि शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरूनच हा वाद नाही. तर राजस्थानमध्ये ज्या महापुरूषांनी जन्म घेतला आहे, त्यांनाही जाती, धर्माच्या नावाने वादात अडवण्यात आले आहे. हे काम सातत्यानं सुरू आहे. असे करून ते देशातील सामाजिक सद्भाव नष्ट करत आहेत. ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून वाद निर्माण केला आहे, अशाच प्रकारे राजस्थानमध्ये महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहाण, बुदांजी मीणा आणि अन्य जे आमचे महापुरूष आहेत, त्यांच्या नावाने नव नवीन वाद निर्माण करण्यात येत आहेत आणि जातींना आपसात लढवण्याचे काम केले जात आहे. जेणेकरून त्यांचा उद्देश्य सफल व्हावा.
भारतातील जे दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत, त्यांना कोण चालवत आहेत? असा प्रश्न त्यांना उपस्थित केल. क्षत्रिय मूलनिवासी महासंघाचे विधी सल्लागार म्हणाले कि आम्ही या दोन प्रमुख पक्षाचे केवळ मतदार आहोत. ते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आमची मतं घेतात तर राजस्थानमध्ये महाराणा प्रताप यांच्या नावाने मते घेतात. त्यांना न शिवाजी महाराज न महाराणा प्रताप यांच्याशी देणे- घेणे आहे. त्यांना पृथ्विराज चौहाण यांच्याशीही कहीही देणे-घेणे नाही. त्यांना केवळ सत्ता हवी असून सत्तेचे सुख उपभोगायचे आहे, अशी घाणाघाती टीका अॅड. शेखावत यांनी नाव न घेता कांग्रेस आणि भाजपवर केली.
क्षत्रिय समुदायाची वारंवार दलित विरोधी म्हणून बदनामी केली जात आहे. ही बदनामी टीव्ही चॅनल किंवा चित्रपटाच्या माध्यमातून केली जात आहे. क्षत्रियांना अत्याचारी, मद्यपी, जुआरी अशा प्रकारचे कॅरेक्टर आजपर्यंत क्षत्रियांचे दाखवण्यात आले आहे. परंतू वास्तविकता काही वेगळीच आहे. जवळपास 700 वर्षांपासून क्षत्रिय सत्तेपासून दूर आहेत. त्यामुळे जे सत्तेपासून दूर आहेत, ते अत्याचार करू शकत नाहीत. संसदेत व्हीपी सिंग यांनी बाबासाहेबाचे चित्र लावले. मंडल आयोगाचे गठन त्यांनीच केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारत रत्न’ हा पुरस्कार व्हीपी सिंग यांनीच दिला. क्षत्रिय समूदाय कधीही अनु.जातीच्या विरोधात राहिलेला नाही, असेही अॅड. जितेंद्र सिंह शेखावत स्पष्ट केले.





