प्रशासकीय नाविन्यता, उत्कृष्टता आणि सुशासन या दोन राज्यस्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित
मुंबई दि २१-नागरी सेवा दिनाचे औचित्य साधून सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित विशेष सोहळ्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मत्स्य व्यवसाय विभागाचे तत्कालीन सचिव, आयुक्त डॉ. अतुल पाटणे प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांना प्रशासकीय नावीन्यता, उत्कृष्टता आणि सुशासनासाठी दोन अत्यंत मानाच्या राज्यस्तरीय प्रथम पारितोषिकांनी गौरविण्यात आले..
हे मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा सन २०२५-२६ या मोहिमेखाली प्रदान करण्यात आले.संयुक्त सागरी मत्स्य व्यवस्थापनराजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन २०२५-२६ या मोहिमेखाली प्रदान करण्यात आले असून, ह्या पुरस्कारांचे स्वरूप रुपये १० लाख आणि प्रशस्तीपत्र असे आहे. लोकसहभागातून मत्स्यक्रांती पुरस्कार श्रेणी राज्य स्तरावरील मुख्यालय (प्रथम पारितोषिक) मिळाले .महाराष्ट्राला लाभलेल्या ८७८ किलोमीटरच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावरील मत्स्यसंपदेचे जतन करण्यासाठी डॉ. अतुल पाटणे यांनी संयुक्त वन व्यवस्थापनच्या धर्तीवर शाश्वत मत्स्यव्यवसायाच्या विकासाकरिता व मत्स्यसंपदेचे संरक्षण/संवर्धन करण्याकरिता प्रस्तावित संयुक्त सागरी मत्स्यव्यवस्थापन हा प्रकल्प प्रत्यक्षात राबवला. वैशिष्ट्य म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून १८२ गावांत कृत्रिम भित्तिका स्थापन केल्या. स्थानिक मच्छीमार सोसायट्यांना संरक्षणाची जबाबदारी देऊन ही आता एक यशस्वी लोकचळवळ ठरली आहे.
मच्छिमारांनी स्वतः ५० मीटर परिसरात मासेमारी न करण्याची स्वयंशिस्त पाळल्याने मत्स्योत्पादनात ऐतिहासिक वाढ झाली आहे.निर्मल सागर सुंदरम् उपक्रमांतर्गत समुद्रातील प्लास्टिक आणि घातक घोस्ट नेट्स बाहेर काढण्यासाठी मच्छिमारांचे प्रबोधन करण्यात आले. कोवळ्या मासळीच्या संवर्धनासाठी किमान कायदेशीर आकारमानाचे नियम पाळण्याची जाणीव या उपक्रमातून निर्माण करण्यात आली. तसेच LED मासेमारी व विनाशकारी बुल ट्रॉलींग वर पूर्णतः बंदी आणून डॉल्फिन, कासव आणि शार्क यांसारख्या दुर्मिळ प्रजातींचे संरक्षण सुनिश्चित करण्यात आले आहे.ड्रोन आधारित देखरेख सागरी सुरक्षेचा डिजिटल कणा पुरस्कार श्रेणी,मंत्रालयीन प्रशासनिक विभाग (प्रथम पारितोषिक) मिळाले
पारंपरिक मच्छिमारांचे हित जोपासण्यासाठी आणि अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी डॉ. अतुल पाटणे यांनी ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली कार्यान्वित केली.तंत्रज्ञानाचा वापर करून राज्याच्या जलधी क्षेत्रात होणारी अवैध मासेमारी आणि परराज्यातील नौकांची घुसखोरी रोखण्यासाठी ही यंत्रणा मैलाचा दगड ठरली आहे. थर्मल इमेजिंगमुळे रात्रीच्या वेळीही अवैध हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे.
सुरक्षा समन्वय होऊन या प्रणालीचे थेट प्रक्षेपण तटरक्षक दल आणि कोस्टल पोलिसांना उपलब्ध करून दिल्याने सागरी सुरक्षा अधिक बळकट झाली आहे. गेल्या वर्षभरात या तंत्रज्ञानामुळे २,९०५ अवैध नौकांवर कारवाई करून सुमारे २२ कोटी ८७ लाख रुपयांचा दंड प्रस्तावित आहे.
प्रशासकीय इच्छाशक्ती आणि यशाचे सातत्य ह्यामुळे हे प्रकल्प डॉ. अतुल पाटणे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कल्पकतेतून साकार झाले असून, सध्याचे सचिव डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याचे यशस्वी संचलन अत्यंत प्रभावीपणे सुरू ठेवले आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा योग्य मेळ घातल्यास सरकारी योजना कशा प्रकारे गेम-चेंजर ठरू शकतात, याचे हे प्रकल्प उत्तम उदाहरण ठरले आहेत.हा दुहेरी सन्मान स्विकारतांना मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी डॉ. एन. रामास्वामी सचिव, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागश्री.किशोर जकाते, उपसचिव मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई,श्रीमती प्रेरणाजी देशभ्रतार आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य,महेश देवरे सहआयुक्त (सागरी)मत्स्यव्यवसाय विभाग नागनाथ भादुलें प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई.या दोन्ही सन्मानाबद्दल प्रशासकीय वर्तुळातून डॉ. अतुल पाटणे आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे कौतुक व अभिनंदन होत आहे




