भंडारा गोंदिया विधानपरिषदेची निवडणूक जाहीर
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. मागील काही वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे.यातील 16 जागा या नियमित आहेत तर नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.यात भंडारा गोंदिया विधानपरिषद जागेचाही समावेश आहे.
या निवडणुकीसाठी 25 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 1 जून अंतिम तारीख असून 2 जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 4 जून अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत आहे. तर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि 22 जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे.





