अचानक नोटा रद्द करणं चुकीचं- उद्धव ठाकरे

0
12

मुंबई, दि. 11- 500 आणि 1000 रूपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर देशभरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज मोदी सरकारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली. अशाप्रकारे अचानक नोटा रद्द करणं चुकीचं असल्याचं यावेळी उद्धव म्हणाले.

नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे ज्यांनी निवडून दिलं त्यांना त्रास होत आहे, नोटा बदलण्याची मुदत सरकारने वाढवायला हवी अशी मागणी त्यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तसेच ज्या ठिकाणी सर्वात जास्त काळा पैसा आहे त्या स्वीस बॅंकेवर कारवाई कधी करणार अशी विचारणाही त्यांनी केली, शिवाय  या निर्णयाचा नेत्यांना त्रास होत नसून जनतेला जास्त त्रास होत आहे, जनतेनं सर्जिकल स्ट्राईक केलं तर जड जाईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला.