मुंबई,दि.२४ः गेल्या काही दिवसांपासून होणार होणार म्हणून अडकून पडलेल्या पोलिस उप अधीक्षक ह्या पदावर पदोन्नती मिळालेल्या पोलिस निरीक्षकांना राज्याच्या गृह विभागाने दिलासा दिला असून कालच ह्या अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलीस उप अधीक्षक,सहा. पोलीस आयुक्त या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या “पोलीस निरीक्षक” या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या “निवडसूची २०२५-२६” मध्ये समाविष्ट असलेले, पुढील तक्त्यातील स्तंभ (२) मध्ये नमूद पोलीस निरीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांना, “पोलीस उपअधीक्षक, सहा.पोलीस आयुक्त” या संवर्गातील पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येत आली असून त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया,आमगाव व तिरोडा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी मिळाले आहेत.आमगावला गोंदिया पोलीस मुख्यालयातील नंदिनी चानपुरकर यांना तर गोंदिया उपविभागीय पोलीस अधिकारी पदी अरविंद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





