नागपूर- येथील हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजताच पालकमंत्र्यांच्या नावावर सुध्दा शिकामोतर्भ झाल्याची माहिती बाहेर येऊ लागली आहे.त्यात आता भाजप आणि शिवसेना सरकार आता गुण्यागोविंदाने कामाला लागले आहे. मंत्रिमंडळाच्या खातेवाटपानंतर आता युतीच्या मंत्र्यांवर पालकमंत्र्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. नव्या पालकमंत्र्यांची लवकरच घोषणा होणार आहे. त्याची संभाव्य यादी सुत्राकडून बेरार टाईम्सच्या हाती आली आहे.
यात नागपूरच्या पालकमंत्री पदी ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,चंद्रपुरच्या पालकमंत्री अथर्मंत्री सुधीर मुनगंटीवार तर गोंदिया भंडाराचे पालकमंत्री पद 1999 नंतर पहिल्यांदाच जिल्ह्याला मिळाले असून अजुर्नी मोरगावचे आमदार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे निशिच्त झाले आहे.गडचिरोलीचे पालकमंत्रीपद राज्यमंत्री राजे अबंरिशराव आत्राम यांच्याकडे देण्यात येणार आहे.
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तर मुंबई उपनगरची जबाबदारी सुभाष देसाई यांच्यावर सोपावून युतीचा धर्म पाळला जाणार आहे.
तर ठाण्यात एकनाथ शिंदे पालकमंत्री होतील. पुण्यात गिरीष बापट यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. ज्या त्या जिल्ह्यातून असलेल्या नेत्यांना पालकमंत्र्यांची जबाबदारी सोपवण्यात आलीये.
पालकमंत्र्यांची संभाव्य यादी
नागपूर-चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रपर-सुधीर मुनगंटीवार
गडचिरोली – अंबरिश अत्राम
भंडारा गोंदिया – राजकुमार बडोले
मुंबई – विनोद तावडे
मुंबई उपनगर – सुभाष देसाई
पुणे – गिरीष बापट
ठाणे – एकनाथ शिंदे
नाशिक – गिरीष महाजन
जळगाव – एकनाथ खडसे
बीड – पंकजा मुंडे
परभणी – दिवाकर रावते
सिंधुदुर्ग – दीपक केसरकर
पालघर – विष्णु सावरा