संविधानाने दिलेल्या आरक्षणासाठी पोवार समाजाने समोर येण्याची गरज-डॉ.बोपचे

0
10

पूणे,berartimes.com दि.१- भारतीय राज्यटनेच्या कलम ३४० अन्वये ओबीसी प्रवर्गात येणाèया जातींना प्रतिनिधीत्व(आरक्षण) मिळाले आहे. पोवार समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश आहे.त्यातच आपला समाज हा शेतीशी निगडित असल्याने गावखेड्यातला समाजबांधव आजही मागासपरिस्थितीत आहे.त्यामुळे समाजाच्या उज्वल भविष्यासाठी पोवार समाजानेही संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी समोर येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक व माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी पुणे क्षत्रिय पोवार समाजाच्या १३ व्या वार्षिक स्नेहसंमेलन संगम या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्षत्रिय पोवार समाज पुणेचे अध्यक्ष वसंत सहारे होते.
पुढे बोलतांना डॉ.बोपचे म्हणाले की आरक्षणाबाबत आपल्या समाजात चुकीचे गैरसमज पसरविले जात असून ज्यांनी पाच हजार वर्षापासून आपल्याकडेच काही गोष्टी राखून आरक्षणाचा लाभ घेतला,ते मनुवादी विचारसरणीचे काही लोक सविधानाने दिलेल्या अधिकाराबाबत ओबीसी समाजात चुकीचा संदेश देऊन आपल्यासह ओबीसी प्रवर्गातील जातीमध्ये भाडंण लावण्याचे काम करीत आहेत.त्यापासूनही आपल्या समाजाने सावध होत सवैधानिक हक्कासाठी ओबीसींच्या लढ्यात सहभागी होणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले.
पुणे पवार समाज संघटनेच्या वतीने येथील एस.के.एम.बियरींग सभागृह qचचवड येथे १३ वे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पुणे व परिसरातील २०० पेक्षा अधिक कुटूंब सहभागी झाले होते.अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.याप्रसंगी अतिथींच्या हस्ते वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाèयांचा सत्कार करण्यात आला. पुणे पवार संघटनेचे अध्यक्ष वसंत सहारे यांनी पुणे क्षत्रिय पोवार समाज संघटनेच्या वतीने राबविल्या जाणाèया उपक्रमाविषयी माहिती देतांना विवाहयोग्य तरूण तरूणींची ओळख करून देण्यासाठी आयोजित मिलन समारंभ, समाजातील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित ‘एस्पायरङ्क व इतर उपक्रमाविषयी माहिती दिली. याप्रसंगी तरूण व लहान मुंलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन अर्पणा बोपचे यांनी केले. तसेच याप्रसंगी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभावंताचा सन्मानपत्र देवून अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला.किशोर बोपचे यानी आभार मानले.
आयोजनासाठी उपाध्यक्ष बी. एस. तुरकर,टी. आर. गौतम,विजय राहंगडाले,सचिव मोहित तुरकर,अतुल राहंगडाले,नवीन बिसेन,उपसचिव रवि कटरे,विवेक तुरकर,युवराज पटले,कुँवर राहंगडाले,स्मित चौधरी,रवि राहंगडाले,कोषाध्यक्ष एम. एम. बिसेन,उप-कोषाध्यक्ष शरद राहंगडाले,रामेश्वर बोपचे,राहुल पटले,सदस्य
किशोर बोपचे,राजेंद्र बिसेन,दामोदर पटले,लोकेश बोपचे,डॉ. त्रिभुवन कटरे,सुखचंद कटरे,योगेश ठाकुर,टी. जी. पवार,तेजराम पटले,तिलेश डी. पटले,भास्कर पटले,हितेश कटरे,अनिल राहंगडाले,योगेश देशमुख,रोहित तुरकर व क्षत्रिय पवार समाज पुणेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

पोवार समाज युवक-युवती परिचय मेळावा १९ फेबु्रवारीला
पोवार समाजातील विवाहयोग्य तरुण-तरूणीचा परिचय मेळावा पुणे पवार समाज संघटनेच्या वतीने १९ फेबु्रवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क ७०० रूपये असून नोंदणीसाठी अतुल रहांगडाले ०९८८११५२२०, धनंजयकटरे ०९०११०५०३२२, नविन बिसेन ०९९६०८८६११६ यांचेशी संपर्क करावा असे आवाहन पोवार समाज पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.