गर्भवती महिलांसाठीची रक्कम थेट त्यांचा खात्यात जमा होणार

0
9

नवी दिल्ली, दि. 1 – गर्भवती महिलांना सहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबरला देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली होती. ही रक्कम महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार होणार आहे. अशी माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणातून दिली. तसेच महिलांसाठी अंगणवाडीच्या माध्यमातून 500 कोटी रुपये खर्च करण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
तरुणांच्या ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ‘स्वयम’ योजना
अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ऑनलाईन शिक्षणासहीत रोजगार प्रशिक्षणावरही भर देण्यात आले आहे. 2022 पर्यंत 5 लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी ‘स्वयम’ योजना आणण्यात आली आहे. तर संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटीची तरतूद करण्यात आली असून याद्वारे तरुणांना रोजगार प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तसंच IIT, मेडिकलसह सर्व उच्चशैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी ‘राष्ट्रीय परीक्षा बोर्ड’ स्थापन करणार असल्याचे जेटली म्हणालेत. शिवाय देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणा-या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.